बहिणीला चित्रपटात घेण्याची रणदीपची इच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 14:33 IST2016-05-18T09:01:44+5:302016-05-18T14:33:05+5:30

 अभिनेता रणदीप हुडा हा सध्या ‘सरबजीत’ आणि ‘लाल रंग’ चित्रपटांमुळे भलताच चर्चेत आहे. सरबजीत मध्ये त्याच्या बहीणीची भूमिका ऐश्वर्या ...

Desire to take sister to film! | बहिणीला चित्रपटात घेण्याची रणदीपची इच्छा !

बहिणीला चित्रपटात घेण्याची रणदीपची इच्छा !

 
भिनेता रणदीप हुडा हा सध्या ‘सरबजीत’ आणि ‘लाल रंग’ चित्रपटांमुळे भलताच चर्चेत आहे. सरबजीत मध्ये त्याच्या बहीणीची भूमिका ऐश्वर्या रॉय बच्चन हिने केली आहे. त्यामुळे त्याला आता भाऊ-बहीण यांच्या नात्यांबद्दल जास्तच ओढा वाढला आहे.

तो म्हणतोय की,‘ मी सध्या तरी चित्रपटात अभिनेता म्हणून काम करतोय. पण जेव्हा मी स्वत: निर्माता बनून चित्रपट काढेन तेव्हा मी त्यात माझ्या बहीणीला अंजलीला त्यात घेईन.

कारण, तिचे अभिनयावर खुप प्रेम आहे आणि ती उत्तम अभिनेत्री होऊ शकते. अंजली ही त्याची मोठी बहीण असून तिने ‘यार मेरा सुपरस्टार’ यात देखील काम केले आहे.

Web Title: Desire to take sister to film!