Video: दुसऱ्यांदा बाबा होणार रणवीर सिंग, चाहत्यांनी केलं अभिनंदन! अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 09:03 IST2026-04-22T09:02:59+5:302026-04-22T09:03:58+5:30

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याच दरम्यान रणवीर सिंगला मुंबईत स्पॉट करण्यात आले, जिथे त्याच्या खास अंदाजाने लोकांची मने जिंकली.

Dad To Be Soon Again ranveer singh spotted after shooting in town today video viral | Video: दुसऱ्यांदा बाबा होणार रणवीर सिंग, चाहत्यांनी केलं अभिनंदन! अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

Video: दुसऱ्यांदा बाबा होणार रणवीर सिंग, चाहत्यांनी केलं अभिनंदन! अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण सध्या प्रचंड चर्चेत आहेत. नुकतंच या दोघांनी आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली, ज्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान रणवीर सिंगला मुंबईत स्पॉट करण्यात आले, जिथे त्याच्या खास अंदाजाने लोकांची मने जिंकली.

रणवीरने मानले चाहत्यांचे आभार

मंगळवारी संध्याकाळी जेव्हा रणवीर सिंग मुंबईत दिसला, तेव्हा तो खूपच आनंदी वाटत होता. त्याने जीन्स आणि लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. तो आपल्या स्टाफसोबत कारच्या दिशेने जात असताना, तिथे उपस्थित चाहते आणि फोटोग्राफर्सनी त्याला मोठ्याने 'अभिनंदन अभिनंदन' म्हणायला सुरुवात केली. रणवीरनेही सर्वांना दिलखुलास हसून प्रतिसाद दिला. इतकंच नव्हे त्याने चाहत्यांकडे पाहून हात हलवून अभिवादन केलं. याशिवाय काही चाहत्यांसोबत हात मिळवून त्यांचे आभार मानले. त्याचा हा खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.


काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. या पोस्टमध्ये त्यांची मुलगी 'दुआ' देखील दिसली होती, ज्यामुळे हा क्षण अधिकच खास ठरला. रणवीर आणि दीपिकाची भेट २०१२ मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती, जिथे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. २०२४ मध्ये त्यांना 'दुआ' ही पहिली मुलगी झाली.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, रणवीर सिंग अलीकडेच त्याच्या 'धुरंधर २' या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसला होता आणि सध्या तो अनेक नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. दुसरीकडे, दीपिका पादुकोण देखील आपल्या कामात व्यस्त असून आगामी काळात ती अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Web Title : रणवीर सिंह फिर बनेंगे पिता; प्रशंसकों ने दी बधाई!

Web Summary : रणवीर सिंह और दीपिका पादुकोण ने अपनी दूसरी गर्भावस्था की घोषणा की। मुंबई में स्पॉट किए गए रणवीर ने प्रशंसकों को उनकी बधाई के लिए धन्यवाद दिया और उनका गर्मजोशी से अभिवादन किया। 2018 में शादी करने वाले इस जोड़े को अपनी बेटी दुआ के बाद अपने दूसरे बच्चे की उम्मीद है।

Web Title : Ranveer Singh to be a father again; fans congratulate!

Web Summary : Ranveer Singh and Deepika Padukone announced their second pregnancy. Spotted in Mumbai, Ranveer thanked fans for their congratulations, greeting them warmly. The couple, who married in 2018, are expecting their second child after their daughter, Dua.