अनिल कपूरचा 'नायक' पाहून मुख्यमंत्री होण्याची प्रेरणा मिळाली? एकनाथ शिंदे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:05 PM2024-04-27T12:05:51+5:302024-04-27T12:09:49+5:30

मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा दिलखुलास अंदाज बघायला मिळाला. त्यावेळी अनिल कपूरच्या नायक विषयी मुख्यमंत्र्यांनी महत्वाचा खुलासा केला. (cm eknath shinde, manish paul, anil kapoor)

Chief Minister eknath Shinde loves Anil Kapoor Nayak movie manish paul podcast | अनिल कपूरचा 'नायक' पाहून मुख्यमंत्री होण्याची प्रेरणा मिळाली? एकनाथ शिंदे म्हणतात...

अनिल कपूरचा 'नायक' पाहून मुख्यमंत्री होण्याची प्रेरणा मिळाली? एकनाथ शिंदे म्हणतात...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या निवडणुकीच्या धामधूमीत सक्रीय आहेत. महाराष्ट्रभर मुख्यमंत्री प्रचारासाठी फिरत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका वेगळ्याचा कारणासाठी चर्चेत आहेत. ते म्हणजे  मनीष पॉलसोबत त्यांनी केलेला पॉडकास्ट. कॉमेडियन आणि अभिनेता मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे सहभागी होते. त्यावेळी त्यांनी अनिल कपूरचा नायक चित्रपट का आवडतो याचा खुलासा केला.

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉडकास्टवर मनीष पॉल यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट उघड केली. त्यात ते म्हणाले " मला एस शंकर यांचं दिग्दर्शन असलेला नायक सिनेमा खूप आवडतो.  त्यातील अनिल कपूरची भूमिका मला मनापासून आवडली. नायक मधील अनिल कपूर यांचं काम उत्तम होत आणि हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे."

नायक सिनेमा २००१ मध्ये रिलीज झालेला. हा सिनेमा बघूनच मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी प्रेरणा घेतली का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "शेवटी सिनेमा हा सिनेमा आहे. आणि वास्तविक आयुष्य वेगळं आहे. अजून काही नाही." असं उत्तर त्यांनी दिलं. मनीष पॉलचा हा पॉडकास्ट तुम्ही त्याच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. यामध्ये एकनाथ शिंदेंनी दिलखुलास उत्तरं दिली आहेत.

Web Title: Chief Minister eknath Shinde loves Anil Kapoor Nayak movie manish paul podcast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.