कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास १+१ ऑफर, सविस्तर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 13:18 IST2024-06-24T13:17:27+5:302024-06-24T13:18:31+5:30

कार्तिक आर्यनचा सध्या चर्चेत असलेला 'चंदू चँपियन' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास ऑफर देण्यात आलीय. या ऑफरचा वापर कसा करायचा जाणून घेण्यासाठी बातमीवर करा क्लिक (kartik aaryan, chandu champion)

chandu champion movie special buy one get one free offer kartik aryan kabir khan | कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास १+१ ऑफर, सविस्तर जाणून घ्या

कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास १+१ ऑफर, सविस्तर जाणून घ्या

सध्या कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' सिनेमा चांगलाच गाजतोय. सांगलीतल्या मुरलीकांत पेटकर यांची प्रेरणादायक कहाणी सिनेमात बघायला मिळतेय. भारत-पाकिस्तान युद्धात मुरलीकांत यांनी ९ गोळ्या झेलल्या. पुढे पायाला दुखापत झाल्यावर त्यांनी पॅरालिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं. कार्तिक आर्यन सिनेमात मुरलीकांत यांची प्रमुख भूमिका साकारतोय. हाच 'चंदू चँपियन' पाहण्यासाठी प्रेक्षकांना १ + १  ची खास ऑफर देण्यात आलीय. जाणून घ्या याविषयी सविस्तर.

'चंदू चँपियन' साठी खास ऑफर. अशी करा अप्लाय

कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' सिनेमा प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवतोय. शबाना आझमी, जावेद अख्तर, कतरिना कैफ,  विकी कौशल, स्मृती मंधाना अशा कलाकारांनी आणि खेळाडूंनी सिनेमाचं कौतुक केलंय. बॉक्स ऑफिसवर मात्र सिनेमा तितकीशी चमक दाखवू शकला नाही. आता सिनेमाचं कलेक्शन वाढवण्यासाठी मेकर्सने एक खास ऑफर प्रेक्षकांना दिलीय. 'चंदू चँपियन' साठी १+१ अशी ही खास ऑफर असून बुक माय शोवर तिकिट बूक करताना तुम्ही या ऑफरचा वापर करु शकता. CCBOGO हा कूपन कोड वापरुन तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. 

'चंदू चँपियन' सिनेमाविषयी थोडंसं..

कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' सिनेमा हा सांगलीच्या मातीत घडलेले जिगरबाज लढवय्ये मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. मुरलीकांत यांना भारत-पाकिस्तान युद्धात ९ गोळ्या लागून अपंगत्व आलं. पुढे त्यांनी पॅरालिम्पिक पोहण्याच्या स्पर्धेत देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. कार्तिक आर्यन  सिनेमात प्रमुख भूमिका साकारतोय. याशिवाय मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सुद्धा सिनेमात खास भूमिकेत आहे. कबीर खान यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 

 

Web Title: chandu champion movie special buy one get one free offer kartik aryan kabir khan