लोकप्रिय अभिनेत्री असूनही नेहा धुपियाचा स्ट्रगल संपेना! म्हणाली - "२२ वर्ष झाली तरीही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 17:30 IST2024-07-22T17:24:21+5:302024-07-22T17:30:51+5:30

नेहा धुपिया ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अजूनही कामासाठी स्ट्रगल करत असल्याचं तिने सांगितलंय (neha dhupia)

bollywood actress Neha Dhupia is still looking for work after being in industry 22 years | लोकप्रिय अभिनेत्री असूनही नेहा धुपियाचा स्ट्रगल संपेना! म्हणाली - "२२ वर्ष झाली तरीही..."

लोकप्रिय अभिनेत्री असूनही नेहा धुपियाचा स्ट्रगल संपेना! म्हणाली - "२२ वर्ष झाली तरीही..."

नेहा धुपिया ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. नेहाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'सिंग इज किंग', 'शिशा', 'अ थर्सडे', 'सनक', 'दे दना दन', 'चूप चूप के' अशा सिनेमांमधून नेहाने अभिनयक्षेत्र गाजवलं. नेहाने अलीकडेच एका मुलाखतीत गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करुनही तिला अजूनही स्ट्रगल करावा लागतोय, याचा खुलासा तिने केलाय. नेहा काय म्हणाली बघा.

नेहाने सांगितली दर्दभरी कहाणी

नेहा धुपिया नुकतीच 'बॅड न्यूज' सिनेमात विशेष भूमिकेत दिसली. यानिमित्ताने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, "मला सध्या बॉलिवूडमधून ऑफर मिळत नाहीत. पण साऊथ इंडस्ट्रीमधून मला अनेक संधी मिळत आहेत. मी अशा क्षेत्रात कार्यरत आहे जिथे मला २२ वर्ष सिनेमाक्षेत्राशी जोडण्याशी संघर्ष करावा लागला आहे. अजूनही करतेय. कधी कधी माझेही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात."

नेहा धुपिया या मुलाखतीत पुढे म्हणाली, "कधीकधी कोणीतरी येतं आणि म्हणतं तुम्ही अमुक तमुक कलाकृतीमध्ये खूप चांगलं काम केलंय. आपण एकत्र येऊन काहीतरी करुया, असं मला म्हणतात. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांसमोर येणं आणि आपलं काम त्यांना दाखवणं महत्वाचं आहे. कधीकधी प्रेक्षकांना आपलं काम आवडत नाही त्यावेळी आत्मपरीक्षण करायची गरज असते."

 

Web Title: bollywood actress Neha Dhupia is still looking for work after being in industry 22 years