१४ वर्षानंतर ‘वेरोनिका’ परतणार? ‘कॉकटेल २’ मध्ये दीपिका पादुकोण करणार कॅमिओ; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:45 IST2026-04-25T12:40:27+5:302026-04-25T12:45:33+5:30
‘कॉकटेल २’ मध्ये दीपिका पादुकोण करणार कॅमिओ; खरं काय? जाणून घ्या...

१४ वर्षानंतर ‘वेरोनिका’ परतणार? ‘कॉकटेल २’ मध्ये दीपिका पादुकोण करणार कॅमिओ; चर्चांना उधाण
Deepika Padukone: हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिक भावनेने यश मिळविणार्यांपैकी सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. 'ओम शांती ओम' सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. दीपिका आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला. 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर', 'ये जवानी है दिवानी', 'पिकू', 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', असे ब्लॉकबस्टर तिने इंडस्ट्रीला दिले आहेत. एकीकडे दीपिका तिच्या दुसऱ्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल देखील चर्चा रंगली आहे. नुकतीच दीपिकाच्या एका आगामी सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
दरम्यान,२०१२ साली दीपिका पादुकोण, सैफ अली आणि डायना पेन्टी यांची प्रमुख भूमिका असलेला 'कॉकटेल'हा सिनेमा चांगलाच गाजला.या चित्रपटात दीपिकाने ‘वेरोनिका’ ही बिनधास्त, आत्मविश्वासी आणि भावनिक मुलीची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. तिच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक झालं. अशातच आता कॉकटेल- २ ची घोषणा झाल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा वेरोनिकाच्या भूमिकेत चित्रपटात कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाला या कॅमिओसाठी या विचारणा करण्यात आली होती आणि तिने तिच्या भागाचे चित्रीकरणही पूर्ण केल्याचं बोललं जात आहे.
मात्र, याबाबत चित्रपट निर्मात्यांकडून किंवा दीपिकाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या या गोष्टी केवळ अफवा असल्याचं मानलं जात आहे.
आता 'कॉकटेल २'मधून नवं त्रिकुट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कॉकटेल २'मध्ये शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत. या सिनेमाच्या पोस्टरने लक्ष वेधून घेतलं आहे. 'कॉकटेल २'मधून नवं त्रिकुट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कॉकटेल २'मध्ये शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत.हा सिनेमा १९ जून २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.