"तेव्हा तो खूप…", पहिल्यांदाच बोल्ड फोटोशूट करताना रणवीरची झालेली 'अशी' अवस्था, सोनाली राऊतने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:08 IST2026-04-16T09:06:52+5:302026-04-16T09:08:26+5:30
"तेव्हा तो खूपच…",'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितला रणवीरसोबत काम करण्याचा अनुभव, बोल्ड फोटोशूट करताना झालेली 'अशी' अवस्था

"तेव्हा तो खूप…", पहिल्यांदाच बोल्ड फोटोशूट करताना रणवीरची झालेली 'अशी' अवस्था, सोनाली राऊतने सांगितला किस्सा
Bollywood Actor Ranveer Singh: बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या धुरंधर-२ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. 'धुरंधर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. खरं तर हा सिनेमा रणवीर सिंह साठी महत्त्वाचा होता.मोठ्या ब्रेकनंतर त्या मोठ्या पडद्यावर झळकला आहे.त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा होताना दिसतेय. अनेकजण त्याच्या कामाची स्तुती करताना दिसत आहेत. तर काहींनी त्याच्यासोबत काम करण्याचे अनुभव शेअर केले आहेत. त्यात आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री सोनाली राऊतने रणवीर सिंगबद्दल एक किस्सा शेअर केला आहे.
सोनाली राऊतला कॅलेंडर गर्ल म्हणून ओळखलं जातं. इतकंच नाही तर सोनालीने काही वर्षांपूर्वी एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमध्ये सोनाली बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत झळकली होती. मॅक्सिम मॅगझिनसाठी हे त्यांनी हे फोटोशूट केलं होतं. त्या फोटोशूटदरम्यान, रणवीर सिंग प्रचंड घाबरलेला आणि थोडा लाजत होता, असं सोनालीने एका मुलाखतीत सांगितलं.
फिल्मबीटशी बोलताना सोनाली म्हणाली,"मी ज्या रणवीरला ओळखत होते तो खूप वेगळा होता. मी त्याच्यासोबत एक शूट केलं आहे.माझ्यासोबत काम करताना रणवीर गोड आणि मनमिळाऊ होता. तेव्हा तो आता जसा उत्साही असतो, तसा नव्हता. तर तो खूपच लाजरा होता. "
त्यानंतर पुढे सोनालीने म्हटलं,"ते फोटोशूट खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस होतं. रणवीर म्हणाला होता - हे माझं अशा प्रकारचे पहिलंच फोटोशूट आहे.तेही एका बिकिनी घातलेल्या मुलीसोबत. तो थोडा अस्वस्थ होता.तो सारखा च्युइंगम खात होता आणि सतत परफ्युम लावत होता. पण, मी मात्र रिलॅक्स होते. तेव्हा फोटोग्राफरने मला सांगितलं, सोनाली, रणवीरला अस्वस्थ वाटू देऊ नकोस. तो थोडा घाबरला आहे. त्यामुळे त्याला कम्फर्टेबल वाटेल, असं वागायला सांगितलं."
"त्यावेळी त्याने म्हटलं होतं, सोनाली हे माझं पहिलंच फोटोशूट आहे. शिवाय तो खूप घाबरलेला होता. मग मी त्याला समजावलं, अरे... तू का घाबरतोय? तू तर कपडे घातले आहेस. उलट मी लाजायला आणि घाबरायला पाहिजे."असं सोनालीने सांगितलं.