होय, सौरव गांगुलीसोबत अफेअर होते...! 18 वर्षांनंतर खुद्द नगमाने केला होता खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 08:00 AM2020-12-25T08:00:00+5:302020-12-25T08:00:02+5:30

यामुळे झाले होते ब्रेकअप...

birthday special things you don not know about nagma, her relationship with sourav ganguly | होय, सौरव गांगुलीसोबत अफेअर होते...! 18 वर्षांनंतर खुद्द नगमाने केला होता खुलासा 

होय, सौरव गांगुलीसोबत अफेअर होते...! 18 वर्षांनंतर खुद्द नगमाने केला होता खुलासा 

googlenewsNext
ठळक मुद्देनगमाची फिल्मी कारकिर्द तिच्या कामापेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली.

अभिनेत्री नगमाचा आज वाढदिवस.  1990 साली प्रदर्शित ‘बागी’ या सिनेमातून नगमाने फिल्मी करिअरची सुरुवात केली. नगमाचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत हा सिनेमा 7 व्या क्रमांकावर होता.  या सिनेमानंतर नगमाच्या घरासमोर निर्मात्यांची रांग लागली आणि अनेक सिनेमात तिची वर्णी लागली. पण 1994 मध्ये प्रदर्शित ‘सुहाग’ वगळला तर दुर्देवाने तिचे यानंतरचे सिनेमे फार कमाल दाखवू शकले नाहीत. यानंतर तिने साऊथकडे मोर्चा वळवला. पण तिथेही तिच्या वाट्याला फार काही यश आले नाही. मग भोजपुरी, पंजाबी सिनेमातही तिने काम केले. तिथेही अपयश पदरी पडल्याचे पाहून  अखेर नगमाने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.  2007 मध्ये बॉलिवूडला रामराम ठोकत नगमा राजकारणात उतरली. 

नगमाची फिल्मी कारकिर्द तिच्या कामापेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली. क्रिकेटजगतातील एका दिग्गज क्रिकेटपटूसोबत तिचे नाव जोडले गेले. तो कोण तर सौरभ गांगुली.


  होय, अभिनेत्री नगमा एका क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी झाली होती. खुद्द नगमाने एका मुलाखतीत या नात्याचा खुलासा केला होता. 

2000 साली सौरभ गांगुली व नगमा यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. सौरभ त्यावेळी विवाहित होता. त्यामुळे दोघांनीही या नात्यावर चुप्पी साधली. पण 2018 मध्ये म्हणजे तब्बल 18 वर्षांनंतर खुद्द नगमाने या नात्याची कबुली दिली होती. हे नाते का तुटले याचाही खुलासा तिने केला होता.

‘आम्ही दोघांनी मीडियासमोर आमच्या प्रेमाची कबुली दिली नसली, तरी सर्वांनाच आमच्या नात्याबद्दल ठाऊक होते. पण कालांतराने हे नाते संपुष्टात आले.  गांगुली करिअरच्या शिखरावर होता, त्याकाळात टीम इंडियाचा पराभव आणि कर्णधाराचा खराब परफॉर्मन्स चाहते सहन करू शकत नव्हते. याचा परिणाम आमच्या नात्यावरही झाला आणि गांगुलीने मला सोडून त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मते, त्याचा निर्णय एकदम योग्य होता.  आम्ही परस्पर सहमतीने एकमेकांपासून वेगळे झालो होता. आता तो भूतकाळ झाला आहे,’असे नगमा या मुलाखतीत म्हणाली होती.

भोजपुरी अभिनेता रवी किशनसोबतही नगमाचे नाव जोडले गेले होते. अर्थात कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. याचे कारण म्हणजे रवी किशन आधीच विवाहित होता.


 

Web Title: birthday special things you don not know about nagma, her relationship with sourav ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.