हॉरर-कॉमेडीची भट्टी जमली की फसली? अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 08:22 IST2026-04-18T08:10:41+5:302026-04-18T08:22:34+5:30

Bhoot Bangla Box Collection Day 1: 'भूत बंगला' ने पहिल्याच दिवसाचं कलेक्शन किती? आकडेवारी आली समोर 

bhoot bangla movie frist day box office collection starrer akshay kumar wamiqa gabbi and paresh rawal | हॉरर-कॉमेडीची भट्टी जमली की फसली? अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर; जाणून घ्या...

हॉरर-कॉमेडीची भट्टी जमली की फसली? अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर; जाणून घ्या...

Bhoot Bangla Box Collection Day 1: अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'भूत बंगला' हा सिनेमा अखेर काल १७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षक मोठ्या आतुरतेने प्रदर्शनाची वाट बघत होते.  अक्षय कुमारबरोबरच चित्रपटात वामिका गब्बी, तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, मिथिला पालकर आणि असरानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार आणि प्रियदर्शन १४ वर्षांनंतर आले आहेत, ज्यामुळे चाहते चित्रपटासाठी अधिकच उत्सुक होते. त्यामुळे आधीच्या सिनेमांप्रमाणे ही जोडी कमाल करू शकली का? 'भूत बंगला' चित्रपट भूत बंगला सिनेमा पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला का? जाणून घेऊया...

दरम्यान, या चित्रपटात अक्षय कुमारने अर्जुन नावाची भू्मिका साकारली आहे, जो आपली बहीण मीरा (मिथिला पालकर) हिच्या लग्नासाठी लंडनहून मंगळपूरला आपल्या वडिलोपार्जित महालात परत येतो.पण, या महालात विचित्र,अनपेक्षित घडत जातात. याच दरम्यान अर्जुनसमोर अनेक जुनी रहस्ये उघड होतात.हॉरर आणि कॉमेडीने परिपूर्ण असलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

चित्रपटाचं कलेक्शन किती?

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ने पहिल्या दिवशी केवळ ८.६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापूर्वी, चित्रपटाने पेड प्रिव्ह्यू शोमधून ३.५० कोटी रुपये कमावले होते. यामुळे चित्रपटाची एकूण कमाई १५. कोटी७५ रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, ही प्राथमिक माहिती आहे, यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

अक्षय कुमार आणि प्रियदर्शनच्या 'भूत बंगला' या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर धुरंधर २ मुळं य सिनेमाची रीलिज डेट दोन वेळा बदलण्यात आली. या जोडीनं यापूर्वी 'हेरा फेरी', 'भूल भुलैया' आणि 'गरम मसाला' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 

Web Title : अक्षय कुमार की 'भूत बंगला' की पहले दिन की कमाई ₹8.61 करोड़।

Web Summary : अक्षय कुमार, तब्बू और परेश रावल अभिनीत 'भूत बंगला' ने पहले दिन ₹8.61 करोड़ कमाए, जिसमें पेड प्रीव्यू सहित कुल ₹15.75 करोड़ की कमाई हुई। यह हॉरर-कॉमेडी 14 साल बाद कुमार और निर्देशक प्रियदर्शन को फिर से साथ लाती है, जिसमें अर्जुन अपनी पुश्तैनी हवेली में लौटता है और अजीब घटनाओं का सामना करता है।

Web Title : Akshay Kumar's 'Bhoot Bangla' opens with ₹8.61 crore.

Web Summary : Akshay Kumar's 'Bhoot Bangla,' also starring Tabu and Paresh Rawal, earned ₹8.61 crore on its opening day, with a total of ₹15.75 crore including paid previews. The horror-comedy reunites Kumar with director Priyadarshan after 14 years, telling the story of Arjun returning to his ancestral home and encountering strange events.