प्रेम-मैत्री यांची अनोखी परिभाषा मांडणारा ‘ऐ दिल हैं मुश्किल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 13:10 IST2016-09-23T07:35:17+5:302016-09-23T13:10:36+5:30

प्रेम आणि मैत्री ही एकसमान असते अशी नातेसंबंधांची अनोखी परिभाषा दिग्दर्शक करण जोहर यांचा बहुचर्चित चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये मांडण्यात आली आहे.

'Aye Dil Hai Tough', which sets out a unique definition of love-friendship. | प्रेम-मैत्री यांची अनोखी परिभाषा मांडणारा ‘ऐ दिल हैं मुश्किल’!

प्रेम-मैत्री यांची अनोखी परिभाषा मांडणारा ‘ऐ दिल हैं मुश्किल’!

रेम आणि मैत्री हे दोन्हीही नाते व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. बरं, आता या दोघांत कोण श्रेष्ठ असं विचाराल तर ‘दोघेही एकसमान’ असेच उत्तर मिळेल. प्रेम आणि मैत्री ही एकसमान असते अशी नातेसंबंधांची अनोखी परिभाषा दिग्दर्शक करण जोहर यांचा बहुचर्चित चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये मांडण्यात आली आहे.

चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. टिझर पाहिल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता लागली होती की आता चित्रपटाचा ट्रेलर केव्हा रिलीज होणार याची? ‘लव्ह टेढा हैं’ या रणबीरच्या डायलॉगने ट्रेलरची सुरूवात होते. अनुष्का शर्मासोबतची घट्ट मैत्री आणि ऐश्वर्या राय बच्चनसोबतची सिझलिंग केमिस्ट्री हे चित्रपटाचे विशेष म्हटले जाईल.

फवादची भूमिका अतिशय छोटी पण महत्त्वपूर्ण वाटते. चित्रपटातील गाणी, डायलॉग्ज हे विशेष लक्ष वेधून घेतात. या चौघांशिवाय आणखीही एकजण आहे जो ट्रेलरमध्ये दिसतोय तो म्हणजे शाहरूख खान. त्याला रणबीर कपूर बोलतांना दिसतोय.

‘अजीब कहानी हैं प्यार और दोस्ती की...प्यार हमारा हिरो, दोस्ती हमारी हिरोईन.’ या डायलॉगने ट्रेलरचा शेवट होतो. चाहत्यांना ट्रेलरच्या माध्यमातुन भुरळ घालणारा ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपट दिवाळीत रिलीज होणार आहे.

">http://

Web Title: 'Aye Dil Hai Tough', which sets out a unique definition of love-friendship.