"आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी..."; अमिताभ बच्चन यांनी सर्वांना दिला मोलाचा सल्ला, एकदा वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 08:57 IST2026-04-24T08:56:22+5:302026-04-24T08:57:56+5:30
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वयाच्या ८३ व्या वर्षीही आपल्या कामाबद्दल प्रचंड उत्साही असतात. या वयातही ते केवळ अभिनयच करत नाहीत, तर सोशल मीडिया आणि ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात

"आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी..."; अमिताभ बच्चन यांनी सर्वांना दिला मोलाचा सल्ला, एकदा वाचाच
बॉलिवूडचे महानायकअमिताभ बच्चन वयाच्या ८३ व्या वर्षीही आपल्या कामाबद्दल प्रचंड उत्साही असतात. या वयातही ते केवळ अभिनयच करत नाहीत, तर सोशल मीडिया आणि ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात. नुकतेच बिग बींनी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये जीवन आणि कामाबद्दलचे आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी 'काम करणं' ही जीवनाची मोठी गोष्ट आहे असं म्हटलंय.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, "मी माझ्या एका सहकाऱ्याकडून शिकलो की, पहाटेची वेळ ही क्रिएटिव्ह विचारांसाठी सर्वात उत्तम असते. जे लोक खऱ्या अर्थाने क्रिएटिव्ह आहेत त्या लोकांसाठी ही वेळ नक्कीच फायदेशीर आहे! पण माझ्यासारख्या लोकांचं काय?"
अमिताभ पुढे लिहिले की, "काम हेच जीवनाचे सार आहे. काम असेल तरच जीवनाचा प्रवास सुरू राहील. एखाद्या रोमांचक ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीच नाही, तर जीवनात पुढे जाण्यासाठी काम करा. आपली आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी काम करा. स्वतःच्या शरीरावर काम करा, काहीही करा पण काम करत राहा."
स्वतःच्या फिटनेसबद्दल भाष्य करताना बच्चन म्हणाले की, या वयात स्वतःच्या शरीरावर काम करणे सर्वात महत्त्वाचे आहे. मानवी शरीराची रचना आपल्या कल्पनेपलीकडची आहे, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, २०२५ मध्ये त्यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या १७ व्या सीझनचे यशस्वी सूत्रसंचालन केले होते. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कल्कि २८९८ एडी' या चित्रपटात त्यांनी 'अश्वत्थामा'ची ऐतिहासिक भूमिका साकारली होती, ज्याचे सर्वत्र कौतुक झाले. सध्या ते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, यात त्यांच्यासोबत प्रभास आणि कमल हासन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत.