'या' लोकप्रिय अभिनेत्रीने मोडला 12 वर्ष मोठ्या दिग्दर्शकासोबतचा संसार; आता होणार आहे आई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:53 PM2024-03-05T14:53:52+5:302024-03-05T14:56:13+5:30

Bollywood actress: या अभिनेत्रीने अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर केली असून साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिचा चांगला वावर आहे.

amala-paul-married-12-year-older-director-but-got-divorced-married-second-time-and-now-pregnant | 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने मोडला 12 वर्ष मोठ्या दिग्दर्शकासोबतचा संसार; आता होणार आहे आई

'या' लोकप्रिय अभिनेत्रीने मोडला 12 वर्ष मोठ्या दिग्दर्शकासोबतचा संसार; आता होणार आहे आई

कलाविश्वात अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी आपल्या वयापेक्षा मोठ्या किंवा लहान व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. मात्र, यातील काही जोड्यांचं वैवाहिक आयुष्य सुखाने सुरु आहे. तर, काही जोड्यांनी अर्ध्यावरच त्यांचा संसार मोडल. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कपलची चर्चा रंगली आहे. या जोडीने वयात तब्बल १२ वर्षांचा फरक असताना लग्न केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.

सोशल मीडियावर सध्या चर्चा होतीये ती अभिनेत्री अमला पॉल हिची. 'नीलाथमारा' या मल्याळम सिनेमातून अमलाने तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २००९ मध्ये ती अजय देवगणच्या भोला या सिनेमातही कॅमियो रोलमध्ये झळकली. त्यामुळे अमला हिला आज जवळपास सारेच जण ओळखतात. अमलाचं प्रोफेशनल लाइफ सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, खऱ्या आयुष्यातही तिने बरेच चढउतार पाहिले आहेत.

२०११ मध्ये अमला दिग्दर्शक ए.एल.विजय यांच्या प्रेमात पडली आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. बराच काळ डेट केल्यानंतर या जोडीने एकमेकांसोबत लग्न गाठ बांधली. २०१४ मध्ये या जोडीने चेन्नईमध्ये लग्न केलं. ए.एल. विजय आणि अमला यांच्या वयात जवळपास १२ वर्षांचं अंतर होतं. परंतु, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. या जोडीने २०१७ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला.

२०२३ मध्ये अमलाने केलं दुसरं लग्न

ए.एल. विजय याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अमलाने २०२३ मध्ये जगत देसाई यांच्यासोबत नव्याने दुसरा संसार थाटला. जगत टूरिझ्म आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात कार्यरत आहेत. या नव्या संसारात अमला छान रुळली असून लवकरच ती आई होणार आहे. अलिकडेच तिने तिच्या प्रेग्नंसीची गोड चाहत्यांना दिली.

Web Title: amala-paul-married-12-year-older-director-but-got-divorced-married-second-time-and-now-pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.