Video: आलू लेलोsss, कांदे लेलोsss; अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' सिनेमातील पहिलं धमाल गाणं भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:26 IST2026-05-18T15:24:05+5:302026-05-18T15:26:24+5:30
बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’चे धमाकेदार टायटल ट्रॅक रिलीज झाले असून, हे गाणे अत्यंत मनोरंजक आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ने या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.

Video: आलू लेलोsss, कांदे लेलोsss; अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' सिनेमातील पहिलं धमाल गाणं भेटीला
बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’चे धमाकेदार टायटल ट्रॅक रिलीज झाले असून, हे गाणे अत्यंत मनोरंजक आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ने या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबतसुनील शेट्टी, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन, लारा दत्ता आणि इतर अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. एवढ्या मोठ्या स्टारकास्टमुळे हा चित्रपट बॉलिवूडमधील कौटुंबिक मनोरंजक चित्रपटांपैकी एक मानला जात असून, चित्रपटाचे संगीतही प्रेक्षकांचं मन जिंकणारं आहे.
हे मूळ टायटल ट्रॅक साजिद-वाजिद यांनी कंपोज केले होते, ज्याला आता विक्रम मोंट्रोसने एका नवीन आणि हाय-एनर्जी अंदाजात रीक्रिएट केले आहे. हे गाणे पूर्णपणे मस्ती आणि मनोरंजनाने भरलेले आहे. शान, प्रिया पाटीदार आणि स्वतः विक्रम मोंट्रोस यांच्या दमदार आवाजाने या गाण्याला एक वेगळीच उंची दिली आहे. गाण्यात शब्बीर अहमद यांच्या मूळ गाण्याच्या ओळींसह मेघा बाली यांचे नवीन शब्द जोडण्यात आले आहेत, जे या गाण्याला एक परिपूर्ण पार्टी एंथम बनवतात.
विशेष म्हणजे वेलकममध्ये नाना पाटेकरांचा 'आलू लेलो, कांदे लेलो' हा संवाद या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा वेगळ्या अंदाजात ऐकायला मिळतोय. चित्रपटाच्या संपूर्ण अल्बममध्ये ६ मोठी आणि भव्य गाणी असणार आहेत. यामध्ये डान्स नंबर्स, ग्लॅमरस गाण्यांचा समावेश आहे. हा अल्बम ‘वेलकम’ फ्रेंचायझीचा संगीतमय वारसा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पुढे नेतो. ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट २६ जून २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.