प्रियांका चोप्राचा ‘हा’ ड्रेस बघून यूजर्सनी म्हटले, ‘संस्कारी असा ड्रेस घालत नाहीत’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 16:45 IST2018-05-06T11:14:50+5:302018-05-06T16:45:00+5:30

प्रियांका चोप्राला तिच्या स्टाइलसाठी ओळखले जाते. नुकतीच ती एका इव्हेंटमध्ये अतिशय हटके अंदाजात बघावयास मिळाली होती. तिचा हा अंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे.

After watching Priyanka Chopra's 'Ha' dress, the users said, 'Sanskritis do not wear such a dress'! | प्रियांका चोप्राचा ‘हा’ ड्रेस बघून यूजर्सनी म्हटले, ‘संस्कारी असा ड्रेस घालत नाहीत’!

प्रियांका चोप्राचा ‘हा’ ड्रेस बघून यूजर्सनी म्हटले, ‘संस्कारी असा ड्रेस घालत नाहीत’!

लिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘क्वांटिको-३’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बुधवारी आपल्या शोच्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान प्रियांका निळ्या रंगाच्या Dion Lee सूटमध्ये बघावयास मिळाली होती. मात्र या आउटफिट्सच्या वरच्या बाजूला काही कट्स होते. ज्यामुळे यूजर्सनी प्रियांकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे प्रियांकाचे तिच्या या ड्रेसवरून कौतुक केले गेले, तर दुसरीकडे तिच्या या पेहरावावर प्रश्न उपस्थित करीत तिला संस्काराचे धडे दिले. एका यूजर्सनी प्रियांकाला सल्ला देताना म्हटले की, संस्कारी लोक अशाप्रकारचे कपडे परिधान करीत नाहीत. काही सोशल मीडिया यूजर्सनी तर असेही म्हटले की, प्रियांका वेडी झाली आहे. 
 

तर काहींनी प्रियांकाचे कौतुक करताना तिच्या स्टाइलचे गोडवे गायिले आहेत. अनेकांनी प्रियांकाच्या या हटके स्टाइलवर आपण फिदा असल्याचे कमेण्ट्सच्या माध्यमातून सांगितले. दरम्यान, प्रियांका या शोनंतर बॉलिवूडमध्ये परतत असून, लवकरच ती दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या ‘भारत’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत असेल. २०१६मध्ये आलेल्या ‘जय गंगाजल’मध्ये प्रियांका अखेरीस बघावयास मिळाली होती. मात्र तिच्या प्रोडक्शन हाउसअंतर्गत बनत असलेल्या पंजाबी, भोजपुरी, सिक्की आणि मराठी भाषेतील चित्रपटांच्या निर्मितीमध्ये ती सक्रीय होती. 
 

प्रियांकाच्या हॉलिवूड करिअरविषयी सांगायचे झाल्यास, २०१७ मध्ये ती ‘बेवॉच’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. ड्वेन जॉनसनची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रियांकाने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. त्याचबरोबर प्रियांकाचा दुसरा हॉलिवूड चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘अ किड लाइक जॅक’ हा तिचा चित्रपट येत्या १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: After watching Priyanka Chopra's 'Ha' dress, the users said, 'Sanskritis do not wear such a dress'!