"Uff! किती टॅलेंटेड आहे..."; अभिनेत्री श्रद्धा कपूरने खुलेआम केलं रुमर्ड बॉयफ्रेंडचं कौतुक, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:00 IST2026-04-27T11:58:22+5:302026-04-27T12:00:40+5:30

श्रद्धा कपूर रिअल लाईफमध्ये रिलेशनशिपमध्ये असली तरीही तिने अजूनपर्यंत तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली नाहीये. अशातच श्रद्धाची एक इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल झाली आहे

Actress Shraddha Kapoor openly praised her rumored boyfriend rahul modi | "Uff! किती टॅलेंटेड आहे..."; अभिनेत्री श्रद्धा कपूरने खुलेआम केलं रुमर्ड बॉयफ्रेंडचं कौतुक, कोण आहे तो?

"Uff! किती टॅलेंटेड आहे..."; अभिनेत्री श्रद्धा कपूरने खुलेआम केलं रुमर्ड बॉयफ्रेंडचं कौतुक, कोण आहे तो?

'स्त्री' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा खऱ्या आयुष्यात पापाराझी आणि मीडियासोबत खेळकरपणे वागताना दिसते. श्रद्धा कपूर रिअल लाईफमध्ये रिलेशनशिपमध्ये असली तरीही तिने अजूनपर्यंत तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली नाहीये. अशातच श्रद्धाची एक इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल झाली आहे. या स्टोरीत श्रद्धाने तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडचं खुलेआम कौतुक केलं आहे. कोण आहे श्रद्धाचा बॉयफ्रेंड?

श्रद्धाने केलं बॉयफ्रेंडचं जाहीर कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नुकतीच तिने शेअर केलेली एक इंस्टाग्राम स्टोरी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. श्रद्धाने तिच्या स्टोरीमध्ये एका जाहिरातीची क्लिप शेअर केली, ज्यामध्ये अभिनेत्री अनीत पड्डा दिसत होती. ही क्लिप शेअर करताना श्रद्धाने अनीतच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले. "क्यूटनेस आणि उत्तम अभिनयाचे एक शानदार मिश्रण", असं कॅप्शन लिहित श्वेताने अनीतचं कौतुक केलं.

मात्र, या स्टोरीमध्ये श्रद्धाने राहुल मोदीचंही कौतुक केल. अनीतचे कौतुक केल्यानंतर श्रद्धाने राहुल मोदीला टॅग करत त्यांच्या टॅलेंटचीही प्रशंसा केली. तिने लिहिले, "आणि क्यूटनेसवरून आठवलं, या जाहीरातीचा लेखक-दिग्दर्शक किती टॅलेंटेड आहे, उफ्फ!" श्रद्धाच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

श्रद्धा आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या बातम्या२०२४ पासून चर्चेत आहेत. अनेकदा या दोघांना मुंबईत एकत्र डिनर डेटवर किंवा विविध कार्यक्रमांमध्ये स्पॉट करण्यात आले आहे. जरी या दोघांनीही अद्याप आपल्या नात्याबद्दल अधिकृतपणे कोणतीही कबुली दिली नसली, तरी श्रद्धाच्या या पोस्टने त्यांच्यातील मैत्रीपलीकडच्या नात्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे, असा अंदाज चाहते लावत आहेत.

कामाच्या आघाडीवर बोलायचे झाले तर, श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफमधील या घडामोडींमुळे चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. श्रद्धा आणि राहुल लग्न कधी करणार याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.

Web Title : श्रद्धा कपूर ने राहुल मोदी की प्रतिभा की खुलेआम प्रशंसा की

Web Summary : श्रद्धा कपूर ने इंस्टाग्राम पर राहुल मोदी की प्रतिभा की प्रशंसा की। उनके निर्देशन की सराहना के बाद रिश्ते की अटकलें तेज हो गईं। 2024 से डेटिंग की अफवाहों के बीच दोनों को कई बार साथ देखा गया। कपूर फिलहाल 'ईठा' की शूटिंग कर रही हैं।

Web Title : Shraddha Kapoor Praises Rumored Boyfriend Rahul Modi's Talent Publicly

Web Summary : Shraddha Kapoor publicly praised rumored boyfriend Rahul Modi's talent on Instagram. This sparked relationship speculations after she lauded his directing skills. The duo has been spotted together, fueling dating rumors since 2024. Kapoor is currently filming 'Itha'.