दीपिकाच्या आधी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:29 IST2024-09-05T16:28:23+5:302024-09-05T16:29:34+5:30

अभिनेत्रीने वयाच्या ३१ व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म दिला.

Actress Pranitha Subhash gave birth to second baby at the age of 31 | दीपिकाच्या आधी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

दीपिकाच्या आधी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोणच्या प्रेग्नंसीच्या चर्चा आहेत. या महिनाअखेरीस दीपिका पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. नुकतंच तिने मॅटर्निटी फोटोशूटही केलं ज्यावरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीए. दरम्यान आणखी एका अभिनेत्री वयाच्या ३१ व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. कोण आहे ती अभिनेत्री?

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री आहे प्रणिता सुभाष (Pranitha Subhash). शिल्पा शेट्टीसोबत ती 'हंगामा २' मध्ये दिसली होती. प्रणिताने मुलाला जन्म दिला आहे. जुलै महिन्यात तिने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. २०२२ साली प्रणिताने मुलीला जन्म दिला होता. तिचं नाव अर्ना असं आहे. तर आता त्यांच्या आयुष्यात नवीन पाहुणा आला आहे. ईटाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "अर्नाच्या वेळी मला काहीच माहित नव्हतं. सगळे जसं सांगतात तसं मी करत होते. पण यावेळी मी खूपच रिलॅक्स होते कारण मला कधी काय करायचं सगळं माहित होतं. नक्कीच काही रात्र जागून काढाव्या लागल्या पण मी हे दिवस एन्जॉय करत आहे. बाळ घरी येणार म्हणून अर्ना तर खूपच उत्साहित आहे. तरी तिला अजून हा तिचा छोटा भाऊ आहे याचा अर्थही कळत नाही. ती फक्त २ वर्षांची आहे."


२०२१ साली प्रणिताने नितीन राजूशी लग्न केलं. लग्नानंतर प्रणिताने कामातून ब्रेक घेतला होता. या वर्षीच तिने सिनेमांमध्ये कमबॅक केलं होतं. मल्याळम आणि कन्नड सिनेमात ती दिसली. 2021 साली 'भुज:द प्राईड ऑफ इंडिया' मध्ये ती शेवटची दिसली. 

Web Title: Actress Pranitha Subhash gave birth to second baby at the age of 31