शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Jayanti 2026: कर्जमाफी की आत्मनिर्भरता? शिवरायांच्या पत्रातून उलगडेल शेतकऱ्यांच्या कल्याणाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:03 IST

Shiv Jayanti 2026 Shivaji Maharaj Farmers Policy: यंदाच्या शिवजयंतीला केवळ जल्लोष नको, तर शिवचरित्र वाचण्याचा संकल्प करा! वाचा हा डोळे उघडणारा लेख.

आजच्या सोशल मीडियाच्या युगात शिवाजी महाराज आपल्याला फक्त भगव्या झेंड्यांत, डीजेच्या तालावर आणि काही सेकंदांच्या रील्समध्येच भेटतात. पण 'अस्सल शिवराय' समजून घ्यायचे असतील, तर त्यांच्या समकालीन पत्रांकडे आणि अस्सल शिवचरित्रांकडे वळावं लागेल. राजकारणाच्या सोयीसाठी जो इतिहास आपल्यासमोर मांडला गेला, त्यापेक्षा महाराजांचं खरं रूप कितीतरी पटीने अधिक प्रगल्भ आणि वास्तववादी होतं. शेतकऱ्याला संकटकाळी मदत करतानाही त्याच्या स्वाभिमानाची जपणूक करणारा हा जगातील एकमेव राजा होता. हाच 'विवेक' आणि 'विचार' समजून घेण्यासाठी आज शिवचरित्राच्या अभ्यासाची नितांत गरज आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती(Shiv Jayanti 2026) आहे, त्यानिमित्त बदलापूर येथील शिवचरित्र अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिलेला हा लेख जरूर वाचा. 

दि. ५ सप्टेंबर १६७६ रोजीचं रामजी अनंत, सुभेदार प्रभानवल्ली यांना लिहिलेलं शिवरायांचं पूर्ण पत्र प्रत्येकाने मनात साठवून ठेवावं असं आहे. एखाद्या शेतकऱ्याला कशी मदत करा याबद्दल महाराजांनी विस्तृतपणे सांगितलं आहे. ही एक प्रकारची SOP (Standard Operating Procedure) आहे. या पत्रात अनेक गोष्टी आपल्याला आज ‘महाराज असं करणार नाहीत कधीच’ अशा वाटतील; कारण आपल्या मनावर गेली कैक वर्ष तसं बिंबलं आहे. महाराजांनी या पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे, “रयतेकडून जिन्नसाचे रुपये कराच्या रूपात गोळा करायचे नाहीत, तर ऐन जिन्नसांच्या बदली जिन्नसाच घ्यायच्या. आणि मग ते जिन्नस बाजारात चढत्या भावाने विकायचे, ज्यातून सरकारचा फायदा होईल.” याने होतं काय, की रयतेलाही तोशीस नाही आणि सरकारचाही फायदा. मग यासाठी “रयेतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी” असं महाराज म्हणतात. पुढे सगळ्यात महत्वाचं आहे. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करायचं हे महाराज सांगतात. “तू (सुभेदारानी) गावागावात फिरून सारे कुळंबी (कुणबी, म्हणजेच कुणबावा करणारा अर्थात शेतकरी) जमा कर, आणि कोणाकडून काय शेती करवून घेता येईल याचा विचार कर. एखाद्याकडे बैलजोडी नसेल तर त्याला पैसे देऊन बैलजोडी खरेदी करून दे, कोणाकडे पोटाला खायला मुळातच काही नसेल तर त्याला दाणे देऊन त्यांच्याकडून शेती करवून घे. जोवर शेतकऱ्याला तवानगी येत नाही तोवर हे असं करावं. पण हे झाल्यावर पुढच्या वर्षीपासून मात्र सरकारकडून जी काही रक्कम दिली असेल ती ‘मुद्दल’ वाढीदिढी न करता हळूहळू सरकारात जमा करावी. एखाद्या कुळंब्याकडे पूर्वीचीच काही बाकी असेल (म्हणजे त्याने पूर्वी कर भरला नसेल) तर त्याची व्यवस्थित चौकशी करून सुभेदाराने मला ते व्यवस्थित पटवून द्यावं, आणि पूर्वीची बाकी असताना आता मात्र सुभेदाराने त्या कुळंब्याकडून योग्य रीतीने शेत करवून घेऊन सरकारचा फायदाच करून दिला आहे ही गोष्ट माझ्या नजरेत आली तर माझ्याकडून त्या कुळास माफीची सनद दिली जाईल. पण अर्थात, हे सगळ्या बाबतीत होता कामा नये. अगदीच जिथे वाटेल तिथेच असं होईल, बाकी हिशेबाचा उसूल घेत जाणे.”

पाहिलं? आता यात ‘महाराजांनी सरसकट कर्जमाफी दिली’ तर त्यांचं मोठेपण सिद्ध झालं असतं का वर जे त्यांनी केलं त्यातून ती सिद्ध होते? उत्तर सोपं आहे. कुणब्यांना सगळं ‘मोफत’ आणि ‘कर माफ’ करून महाराजांना कागदावर मोठेपण कमावता आलं असतं, पण हा राजा रयतेचा होता. रयतेला फुकट देऊन रयतेचा राजा होता येत नाही; तर रयतेला ‘स्वाभिमान’ काय असतो हे दाखवून स्वतःच्या पायावर उभं करण्यात महत्व आहे हे महाराजांनी ओळखलं. शेतकरी आत्मसन्मानाने जगेल, सरकारच्या जीवावर जगणार नाही हे शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचं आहे; शिवाय सरकारचाही फायदा होईल या दोन्ही गोष्टी महाराजांनी साधून घेतल्या. 

अशी असंख्य पत्र आहेत ज्यात ‘शिवराय’ समजून घ्यावे लागतात. राजकारणाच्या सोयीसाठी गेली कैक वर्ष इतिहासातून अनेक गोष्टी वगळण्यात आल्या. मग त्या धारि असतील, सामाजिक असतील वा इतरही काही लहानमोठ्या बाबी असतील. जातीयता तर महाराष्ट्राला नवीन नाहीच. अशा सगळ्यात एक सुज्ञ वाचक म्हणून अथवा शिवचरित्राचा अभ्यासक म्हणून; अगदीच तेही नाही तर ‘शिवरायांना मी मानतो’ हे एकच कारणही पुरेसं आहे- पण शिवचरित्र वाचणं आणि अभ्यासणं गरजेचं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विजयराव देशमुख, गजानन भास्कर मेहेंदळे अशा अनेक विभूतींनी आयुष्य खर्ची घालून शिवचरित्रावर संशोधन करत साधार, पुराव्यांनिशी शिवचरित्र लिहिली आहेत. हे ग्रंथ वाचायला वेळ लागेल, तो महिना-दोन महिने काढून, दिवसातला किमान अर्धा तास काढून अवश्य वाचा. मग आपलं आपल्यालाच उमगेल. दिवसभरात इंस्टाग्रामवर दिसणारं आणि रस्त्यावर राजकारण्यांनी पैसे फेकून उगवलेलं ‘शिवभक्तांचं’ किती तकलादू आहे. अस्सल शिवचरित्र ‘निखळ सोनं’ आहे. ते जेवढं वाचाल, त्यावरून जेवढा हात फिरवलं तेवढं झळाळणार आहे. प्रतीक्षा आहे ती केवळ एक पाऊल पुढे टाकून अभ्यास करण्याची. तेव्हा, किमान या शिवजन्मदिनी तरी हा संकल्प करणार ना? शिवरायांच्याच समकालीन एका तेजस्वी दासाने म्हटलंच आहे, “वन्ही तो चेतवावा रे, चेतविताच चेततो। विवेक जाणिजे तैसा, वाढवितांच वाढतो।।” बहुत काय लिहिणे? लेखनसीमा.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Jayanti 2026: Self-reliance, not loan waivers, key to farmers' welfare.

Web Summary : Shivaji Maharaj's letters reveal his vision for farmer empowerment through self-reliance, not handouts. He prioritized fair trade, support for cultivation, and gradual repayment of assistance, fostering dignity and economic strength. Authentic Shivcharitra study is crucial to understand his progressive approach.
टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहासFarmerशेतकरीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणShivjayantiशिवजयंती