झिम्बाब्वे राष्ट्रपतींना शंभरीपर्यंत राहायचे सत्तेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 09:18 IST2016-03-05T16:18:46+5:302016-03-05T09:18:46+5:30

 राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना वयाच्या शंभरीपर्यंत त्यांना देशाचा राष्ट्रपती म्हणून राहायचे आहे

Zimbabwe Power to Stay President till Zimbabwe | झिम्बाब्वे राष्ट्रपतींना शंभरीपर्यंत राहायचे सत्तेत

झिम्बाब्वे राष्ट्रपतींना शंभरीपर्यंत राहायचे सत्तेत

्तेचा मोह भल्याभल्यांना सुटता सुटत नाही. साध्या संस्थेचा प्रमुख असणे किती महत्त्वाची बाब असते. मग विचार करा एखाद्या देशाचा प्रमुख असणारा व्यक्ती त्या पदावर कायम राहण्यासाठी काय काय आटापिटा करेल?

झिम्बाब्वेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांनादेखील त्यांचे पद सोडायचे नाही. त्यांनी तर घोषणाच केली की, वयाच्या शंभरीपर्यंत त्यांना देशाचा राष्ट्रपती म्हणून राहायचे आहे. सध्या त्यांचे वय ९२ वर्षांचे आहे.

मी कोणालाही माझा वारसदार घोषित करणार नाही. माझी पत्नी ग्रेसदेखील माझ्यानंतर पार्टीची अध्यक्ष राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Robert And Grace

एखाद्या नेत्याची अशी महत्त्वाक्षा अगदीच नवीन नाही. झिम्बाब्वेच्या शेजारील देशाचा नेता हॅस्टिंग्स बांडा शंभर वर्षांला केवळ पाच महिने कमी असण्यापर्यंत खुर्चीवर टिकून होते. मलावीचे राष्ट्रपतीदेखील ९५ वर्षांपर्यंत सत्तेत होते.

Web Title: Zimbabwe Power to Stay President till Zimbabwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.