तरुणाई ते सेलिब्रेटी ...टॅटूची क्रेझ कायम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 20:15 IST2016-06-15T14:43:14+5:302016-06-15T20:15:02+5:30
भारतात प्राचीन काळात बऱ्याच कला अस्तित्वात होत्या. त्यातील काही कला लोप पावल्या तर काही कलांनी आधुनिक रुप धारण केले आहे.....

तरुणाई ते सेलिब्रेटी ...टॅटूची क्रेझ कायम!
आकर्षक लूकसाठी टॅटूचा वापर
आधुनिक लूक आत्मसात करत असलेल्यांसाठी कोणताही रफ अँड टफ लूक देणारा टॅटू शोभून दिसेल. महिलांसाठी एंजल टॅटू, क्रॉस, पोर्र्टेट, स्टार टॅटू, फ्लॉवर टॅटू, प्रियकराचे नाव आदी ट्रेंड लोकप्रिय आहेत. टॅटू दोन प्रकारे काढले जातात, त्यात काही दिवस हौस भागवून घ्यायची असेल तर तात्पुरते टॅटू आणि दीर्घकाळ हवा असल्यास मशिनच्या साहाय्याने टॅटू रेखून घेण्यात येतात. मात्र यासाठी खूप सहनशक्ती हवी.
हॉलिवूडकरांना विशेष प्रेम
ही फॅशन आता चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्री आणि रॅम्प वॉक करणाºया मॉडेल्सपासून सगळ्यांना टॅटू कलेने आपलेसे केले आहे. सेलिब्रिटी आपल्या शरीरावर आवर्जून टॅटू गोंदूण घेतात. आपले व्यक्तिमत्त्व वेगळे दिसावे आणि तरुणाईच्या मनात आकर्षणता निर्माण व्हावी हा त्यामागील हेतू असतो. विशेषत: हॉलिवूड चित्रपटात टॅटू काढून घेण्याची क्रेझ जास्त आहे. त्याचेच अनुकरण करीत बॉलिवूडमध्येही बºयाच चित्रपटांमध्ये नायकांनी टॅटू काढलेले आपणास पाहावयास मिळतात. नुकताच प्रदर्शित झालेला हाऊसफुल-3 मध्ये अभिषेक बच्चनच्या मानेवर टॅटू काढलेला आहे. या टॅटूमुळे अभिषेकचा लूक काही औरच दिसतो.
प्रत्येक इंचाला १५०० रुपये खर्च
तरुणाई टॅटूच्या प्रेमात आहे. त्या पे्रमापोटी अंगावर टॅटू मिरवण्यासाठी हजारो रुपये खर्च करायलाही तयार आहे. हाय प्रोफाईल तरुणांमध्ये टॅटूचे जास्त वेड असले तरी मध्यमवर्गीय महाविद्यालयीन तरुणांमध्येही टॅटूचे फॅड दिसू लागले आहे. कायमस्वरूपी टॅटू काढण्यासाठी प्रत्येक इंचाला १५०० रुपये खर्च येतो. विविध प्रकारचे कायमस्वरूपी टॅटू अंगावर गोंदवून घेताना प्रचंड वेदना तर होतेच, परंतु कित्येक तासही खर्ची होतात.
टॅटूची नाविण्यता
दिवसेंदिवस टॅटूचे आधुनिकीकरण होत आहे. त्यात राशीचे चिन्ह, ड्रॅगन, गुलाब, स्वत:च नाव असे टॅटू असे पर्याय आले आहेत. टॅटूसाठी विशेष रंग वापरले जातात. लहान मोठयांपासून सर्वांना आकर्षित करणाºया टॅटूबरोबर आरोग्याची सुरक्षितता आणि त्यामागील धोक्याचे आकलन हे महत्त्वाचे आहे.
पेंटिंग टॅटूमध्ये एअरब्रशच्या साहाय्याने रंग भरून रेखला जातो. यासाठी सुरुवातीला नक्षीचे स्टिकर त्वचेवर चिकटवतात. एकदा हे स्टिकर चिकटवले की एअरब्रशच्या साहाय्याने रंग भरले जातात. स्टिकर टॅटू हा प्रकार मुलांमध्ये जास्त प्रिय आहे. पण एखादे चांगले डिझाईन असेल तर महिलासुद्धा स्टिकर टॅटू चिटकवू शकतात. शरीराच्या ज्या भागावर टॅटू हवा असेल तिथे थोडा वेळ हे स्टिकर चिकटवून ठेवावं. त्यावर थोडं पाणी शिंपडावं. झाला स्टिकर टॅटू तयार.
महिलांनाही टॅटूची भुरळ
मेहंदी टॅटू ही तर खास महिलांची फॅशन. सध्या मानेवर, मनगटावर, दंडावर अगदी पोटावरही मेहंदी टॅटू बनवून घेता येतो. धार्मिक टॅटू हा प्रकारही सध्या ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये आवडत्या देवतेचं चित्र, मंत्र अथवा सुचिन्ह टॅटूस्वरूपात रेखले जातात. मुलींना खास करून सॉफ्ट म्हणजे फुलपाखरू, एखादे फूल अशा प्रकारचा टॅटू काढून घ्यायला आवडतं तर मुलांची आवड थोडी वेगळी असते. म्हणजे ड्रॅगनसारखे टॅटू आवडतात. काही जणांना आध्यात्मिक टॅटू म्हणजे ओम किंवा एखाद्या देवाची प्रतिकृती काढून घ्यायला आवडते.