यु ट्यूबचे ‘किड्स अॅप’ लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 17:55 IST2016-11-15T17:55:18+5:302016-11-15T17:55:18+5:30
बालकांना सुरक्षितपणे कंटेंट पाहता यावे म्हणून यु ट्यूबने खास ‘किड्स अॅप’ नुकतेच लॉन्च केले आहे. सध्या प्रत्येक घरात स्मार्टफोन आहेत. त्यातच इंटरनेट वापरणाऱ्याची संख्यादेखील तेवढीच आहे

यु ट्यूबचे ‘किड्स अॅप’ लॉन्च!
ब लकांना सुरक्षितपणे कंटेंट पाहता यावे म्हणून यु ट्यूबने खास ‘किड्स अॅप’ नुकतेच लॉन्च केले आहे. सध्या प्रत्येक घरात स्मार्टफोन आहेत. त्यातच इंटरनेट वापरणाऱ्याची संख्यादेखील तेवढीच आहे. मात्र बालकांच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या या इंटरनेटवरील हिंसक, लैंगिक तसेच इतर आक्षेपार्ह कंटेटसाठी यु ट्यूबने सादर केलेले ‘किड्स अॅप’ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. नको ते व्हिडीओज बालकांच्या नजरेस पडू नयेत असा पालक आटापिटा करत असतात. नेमकी हीच समस्या लक्षात घेत 'किड्स अॅप' लाँच करण्यात आले आहे. यु ट्यूबने गेल्या वर्षापूर्वी अमेरिकेत ‘किड्स अॅप’ सादर केले होते. आता भारतासह अन्य २० राष्ट्रांमध्ये हे अॅप सादर करण्यात आले आहे. यात विशेषत: बालकांना डोळ्यासमोर ठेवून व्हिडीओजची लायब्ररी देण्यात आली आहे. यात हिंदी व इंग्रजीतील उत्तमोत्तम मनोरंजनपर तसेच शैक्षणिक व्हिडीओजचा समावेश असेल. तसेच हव्या त्या वेळेतच मुले व्हिडीओज पाहावेत म्हणून यावर पासवर्डची व्यवस्था केली आहे.