'एक्स मॅन : अपोकालिप्स' वादाच्या भोवर्‍यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:34 IST2016-01-16T01:09:29+5:302016-02-05T10:34:15+5:30

एक्स मॅन सिरीजच्या 'एक्स मॅन : अपोकालिप्स' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर नुकताच रिलिज करण्या...

'X Man: Apocalypse' | 'एक्स मॅन : अपोकालिप्स' वादाच्या भोवर्‍यात

'एक्स मॅन : अपोकालिप्स' वादाच्या भोवर्‍यात

्स मॅन सिरीजच्या 'एक्स मॅन : अपोकालिप्स' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर नुकताच रिलिज करण्यात आलेला आहे. ज्या लोकांना सुपरहिरोविषयी आकर्षण आहे, त्यांच्यासाठी हा ट्रेलर मेजवानीच ठरले आहे. मात्र यातील खलनायकाची तुलना भगवान श्रीकृष्णाशी केल्याने काही हिंदू संघटनांनी यास विरोध केला आहे. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एक्स मॅनमध्ये अपोकालिप्स या पात्राने खलनायकाची भूमिका साकारली आहे. अपोकालिप्स हा प्राचीन काळापासून देव म्हणून पूजला जातो. अपोकालिप्सची भूमिका साकारणार्‍या ऑस्कर इसाकच्या तोंडी ट्रेलरमध्ये 'मला माझ्या आयुष्यात बर्‍याच नावानी ओळखले गेले आहे. त्यामध्ये 'रा, कृष्णा आणि याहावे' असा उल्लेख आहे. थोडक्यात अपोलिक्सची तुलना श्रीकृष्णाशीच केल्याने, युनिर्व्हसल सोसायटी ऑफ हिंदूइजमचे अध्यक्ष राजन जेद यांनी या ट्रेलरवर आक्षेप घेत, चित्रपटातील हे संवाद वगळले जावेत अशी मागणी केली आहे. याबाबत राजन जेद यांनी निर्देशक रायन सिंगर यांना कृष्णाशी संबंधित सर्व संदर्भ ट्रेलरमधून आणि संपूर्ण चित्रपटातून वगळण्याचे आवाहन केले आहे.

 

Web Title: 'X Man: Apocalypse'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.