​हा आहे जगातील सर्वात सुंदर चेहरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 19:48 IST2016-09-04T14:18:22+5:302016-09-04T19:48:22+5:30

अमेरिकेतील एका कॉस्मेटिक सर्जनच्या मतानुसार विज्ञान आपल्याला सांगू शकते की, जगातील सर्वात सुंदर चेहरा कसा असेल.

This is the world's most beautiful face ... | ​हा आहे जगातील सर्वात सुंदर चेहरा...

​हा आहे जगातील सर्वात सुंदर चेहरा...

ातील सर्वात सुंदर चेहरा कोणता असा प्रश्न विचारल्यावर सहमती होणे तसे अशक्यच. ‘सौंदर्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यात असते’ या अर्थाचे इंग्रजी वाक्य खूप प्रचलित आहे. परंतु अमेरिकेतील एका कॉस्मेटिक सर्जनच्या मतानुसार विज्ञान आपल्याला सांगू शकते की, जगातील सर्वात सुंदर चेहरा कसा असेल. 

‘सेंटर फॉर अ‍ॅडव्हॅन्सड् फेशियल कॉस्मेटिक अँड प्लॅस्टिक सर्जरी’ मधील सर्जन डॉ. ज्युलियन डीसिल्वा यांनी ‘परफेक्सट फेस’ कसा असेल याची प्रतिकृती तयार केली आहे. मागच्या दहा वर्षांत त्यांच्याकडे येणाऱ्या एक हजार पेक्षा जास्त महिला पेशंट्सनी केलेल्या डिमांडस्वरून डॉ. ज्युलियन यांनी हा चेहरा आरेखित केला आहे. 

केट मिडलटनचे नाक, अँजेलिना जोलीचे गाल, किआरा नाईटलीचे डोळे, मायली सायरससारखे कपाळ, पेनेलोप कु्रझचे ओठ, सेलिना गोमेझची हनुवटी अशा एकाहून एक बेस्ट फीचर्सचा मिळून एक चेहरा डॉ. ज्युलियन यांनी तयार केला.

Beutiful Face

डॉक्टर सांगतात की, केट मिडलटनसारखे नाक करून देण्याची मागणी सर्वाधिक केली जाते. कारण गणितीयदृष्ट्या तिचे नाक सर्वोत्तम आहे. तिच्या नाकाच्या टोकाचे रोटेशन परफेक्ट १०६ डिग्री आहे. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, १०४ ते १०८ डिग्री टीप रोटेशन असणारे नाक सर्वात सुंदर असते. मागे डॉ. ज्युलियनच्या मते गोल्ड रेशिओनुसार अ‍ॅम्बर हर्डचा चेहरा जगात सर्वात सुंदर आहे.

Web Title: This is the world's most beautiful face ...