जगभ्रमंती करणारा चहा विक्रेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:56 IST2016-01-16T01:14:54+5:302016-02-07T12:56:38+5:30

केवळ जगभ्रमंती हे जीवनाचे उद्दिष्ट बनविलेल्या या माणसाने चक्क 17 देशांची सफर आतापयर्ंत पूर्ण केली आहे.

A world-famous tea seller | जगभ्रमंती करणारा चहा विक्रेता

जगभ्रमंती करणारा चहा विक्रेता

चून आश्‍चर्य वाटेल, पण आपण ठरविलेले कोणतेही काम कोणत्याही पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्धार करण्यासाठी चहा विक्रेता विजयनने ही सफर केली आहे.

केवळ जगभ्रमंती हे जीवनाचे उद्दिष्ट बनविलेल्या या माणसाने चक्क 17 देशांची सफर आतापयर्ंत पूर्ण केली आहे.

कुठलीही परिस्थिती असो, ध्येय पूर्ण करण्याची हिंमत आपल्याला विजयन देतात. हा प्रवास त्यांनी एकटाच नाही तर त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन केला आहे हे विशेष.

त्यांची पत्नीही त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास हवी ती मदत करते. एव्हाना पत्नीच त्यांची प्रेरणा आहे असेही ते सांगायला विसरत नाही. आपण एकदाच जन्म घेतो. त्यामुळे आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण करा, असे विजयन सांगतात.

Vijayan

कोची येथे राहणार्‍या विजयन यांनी आतापयर्ंत फ्रान्स, युके, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इजिप्त यांसारख्या अनेक देशांची सफर केली आहे. हा सर्व प्रवास त्यांनी प्रसंगी कर्ज काढून पूर्ण केला आहे. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हा एक मोठा संदेश आपल्याला विजयन देऊन जातात.

Vijayan

Web Title: A world-famous tea seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.