दिखावे की है दुनिया सब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 02:55 IST2016-03-10T09:55:41+5:302016-03-10T02:55:41+5:30

कमी उंची असणारे पुरुष आणि स्थूल महिलांना स्मार्ट दिसणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी पगार मिळतो.

The world of appearances is all! | दिखावे की है दुनिया सब!

दिखावे की है दुनिया सब!

खाव्यापेक्षा माणसाच्या कर्तृत्वाला जास्त महत्त्व दिले पाहिजे, असे म्हटले जाते. परंतु रिअल जगात असे होतान दिसत नाही. एका संशोधनानुसार, कमी उंची असणारे पुरुष आणि स्थूल महिलांना स्मार्ट दिसणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी पगार मिळतो.

इंग्लंडमधील एक्सटर विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अध्ययनात संशोधकांनी अनुवांशिकशास्त्राच्या मदतीने सिद्ध केले की, पुरुषामध्ये कमी उंची आणि महिलांमध्ये अधिक वजन त्यांच्या प्रगतीतील सर्वात मोठे अडथळे आहेत. 

४० ते ७० वयोगटातील १.२ लाख लोकांनी सहभाग घेतलेल्या युके बायोबँकेतून संशोधकांनी अनुवांशिक माहिती मिळवली आणि तिच्या विश्लेषणाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला.

यावेळी असे दिसून आले की, जर अनुवांशिकतेमुळे पुरुषाची उंची ७.५ सेंटिमीटरने कमी असेल तर उंच पुरुषाच्या तुलनेत तो वर्षाकाठी १.५ हजार पौंड कमी कमावतो.

low salary

त्याचप्रमाणे जर एखादी महिला अनुवांशिकतेमुळे तिच्या उंचीच्या मानाने थोडी स्थूल (6.3 कि ग्रॅ) असेल तर त्याच उंचीच्या, पण सडपातळ महिलेच्या तुलनेत वर्षाला १.५ हजार पौंड कमी पगार मिळवते.

Web Title: The world of appearances is all!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.