​महिलांना ‘नोकरी’मध्ये टिकवणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 16:10 IST2016-05-10T10:40:52+5:302016-05-10T16:10:52+5:30

नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जरी वाढली असली तरी काही काळाने नोकरी सोडणाऱ्या महिलांचे प्रमाणही खूप अधिक आहे.

Women should be kept in 'jobs' | ​महिलांना ‘नोकरी’मध्ये टिकवणे गरजेचे

​महिलांना ‘नोकरी’मध्ये टिकवणे गरजेचे

रुषाच्या खांद्याला खांदा देऊन चालणारी आजची स्त्री खरोखरंच पुढारलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा दबादबा आहे. ‘चुल आणि मुल’ या साचेबद्ध चौकोटीतून ती केव्हाच बाहेर पडली आहे.

ती शिकत आहे, करिअर कॉन्शियस आहे. नोकरी करून स्वत:च्या पायावर तिला उभे राहायचे आहे. बहुतांश प्रमाणात ते घडतही आहे. पण एका गोष्टीकडे सध्या विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जरी वाढली असली तरी काही काळाने नोकरी सोडणाऱ्या महिलांचे प्रमाणही खूप अधिक आहे.

‘द स्वाडल’च्या संस्थापिका कार्ला बुकमन सांगातात, ‘महिला शिकताहेत, नोकरी करताहेत, नवी उतुंग शिखरे गाठताहेत, पण यालासुद्धा एक कालमर्यादा आहे. लग्न झाल्यावर किंवा मुलं झाल्यावर आजही अनेक स्त्रीयांना चांगली नोकरी सोडून संसारामध्ये अधिक लक्ष घालावे लागते.’

अनेक सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक कारणांमुळे महिलांना करिअरचा त्याग करावा लागतो. महिलांमध्ये असणाऱ्या अफाट ऊर्जेचा पूर्णपणे वापर करून घेण्यास कमी पडत आहोत.

कुटंबाने साथ दिली तर ‘वुमेन वर्कफोर्स’ची होणारी गळती थांबवू शकतो. कार्ला बुकमन महिलांना करिअरविषयक मार्गदर्शन करतात. नोकरी सोडण्याचे त्यांचे कारण समजून त्यावर काही उपाय काढता येऊ शकतो यााबाबत त्या कार्य करतात.

Web Title: Women should be kept in 'jobs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.