​महिला देतात कमी स्पर्धा असलेली नोकरीला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 15:53 IST2016-05-15T10:23:21+5:302016-05-15T15:53:21+5:30

महिला अशा नोकरीला प्राधान्य देतात जिथे कमी लोक जॉब अप्लाय करतील.

Women prefer to work with less competition | ​महिला देतात कमी स्पर्धा असलेली नोकरीला प्राधान्य

​महिला देतात कमी स्पर्धा असलेली नोकरीला प्राधान्य

कऱ्यांमध्ये स्त्री-पुरुष असमानतेविषयी एक महत्त्वाचा निष्कर्ष नव्या अध्यायनामध्ये हाती लागला आहे.

त्यानुसार महिला अशा नोकरीला प्राधान्य देतात जिथे कमी लोक जॉब अप्लाय करतील. म्हणजे जिथे स्पर्धा कमी अशीच नोकरी करण्याकडे महिलांमध्ये कल असतो.

या उलट पुरुष अधिक स्पर्धा असलेली नोकरी शोधत असतात. कदाचित हेच कारण असावे की, महत्त्वाच्या आणि वरच्या हुद्यावर पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे.

एखाद्या नोकरीमध्ये किती पगार आहे यावरून किती लोक आकर्षित होतील हे ठरत असते. जास्त पगाराच्या नोकऱ्या अर्थातच एक्झिक्युटिव्ह लेव्हलचे पदांसाठी अधिक लोक अर्ज करत असतात.

म्हणून मग महिला अशा नोकरीसाठी अर्ज करण्याचे टाळतात. संशोधनाच्या प्रमुख आणि मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापिका कॅथरिन हनेक सांगतात, आमचे संशोधन नोकऱ्यामध्ये असणाºया स्त्री-पुरुष असमानतेवर नवा प्रकाश टाकणार यात काही शंका नाही.

जर्नल आॅफ अप्लाईड सायकोलॉजीमध्ये याविषयी शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. 

Web Title: Women prefer to work with less competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.