कोण म्हणतं सिम्पल फॅशन अॅट्रॅक्टिव्ह दिसत नाही म्हणून, एकदा करून तर बघा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 18:07 IST2017-05-03T18:07:51+5:302017-05-03T18:07:51+5:30
फॅशन करायची म्हणजे काहीतरी विचित्र बटबटीत करायचं असं अजिबातच नाही.फॅशन जगतात सिम्पलीसिटीलाही तितकच महत्त्व देण्यात आलं आहे.

कोण म्हणतं सिम्पल फॅशन अॅट्रॅक्टिव्ह दिसत नाही म्हणून, एकदा करून तर बघा!
- मोहिनी घारपुरे - देशमुख
फॅशन करायची म्हणजे काहीतरी विचित्र बटबटीत करायचं असं अजिबातच नाही. एकंदर व्यक्तिमत्त्वाला जे शोभून दिसेल, ज्या कपड्यांतून आपलं व्यक्तिमत्व उठून दिसेल अशा प्रकारच्या कपड्यांची निवड करणं हे फॅशनचं बेसिक प्रिन्सिपल विसरून चालणार नाही. त्यामुळेच फॅशन जगतात सिम्पलीसिटीलाही तितकच महत्त्व देण्यात आलं आहे.
उत्तम प्रतीच्या कापडापासून आकर्षक पद्धतीनं शिवलेले साधे कपडेही अनेक प्रसंगांना ग्रेसफुल दिसतात. सहज सुंदर वावर करणाऱ्या मुलींची चॉईस म्हणूनच अनेकदा असे सिंपल सोबर कपडे असतात. अलिकडे जीन्सवर असे सिंपल हाय कॉलर्ड फॉर्मल शर्ट किंवा आॅफ शोल्डर टॉप्स घालण्याचीही फॅशन आहे. तसंच जराशा मोठ्या वयाच्या स्त्रियांमध्ये प्लेन फॅब्रिकच्या आणि जरीची बॉर्डर असलेल्या साड्या नेसण्याचा ट्रेण्ड असल्याचंही विशेषत्वानं दिसून येतं. या ट्रेण्डला नामांकीत नट्याही अपवाद नाहीत हे विशेष.