कोण आहे हा मराठी अभिनेता? ओळखा पाहू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 21:39 IST2016-04-06T04:39:07+5:302016-04-05T21:39:07+5:30
अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करीत असतात.

कोण आहे हा मराठी अभिनेता? ओळखा पाहू...
अ ेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करीत असतात. महाराष्ट्रातील घराघरात पाहोचलेल्या एका लाडक्या अभिनेत्याने आपला बालपणीचा एक फोटो काही दिवसांपूर्वी ट्विटवर प्रसिद्ध केला होता.
दोन महिन्यांपूर्वीच या कलाकाराच्या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. मात्र आजही त्याची ओळख मालिकेतील नावानेच केली जाते. सध्या त्याचे ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक बरेच गाजत आहे. त्याच्यासाठी तो आॅस्ट्रेलिया पोहचला आहे. ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातून तुम्हाला लवकरच तुम्ही त्याला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.
![]()
आता तरी ओळखलं का? या कलाकाराला....अहो, ‘होणार सून मी या घरची...’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला, नुसता घरातच नाही तर कित्येकांच्या मनात जागा मिळविणारा ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर याचा हा बालपणीचा फोटो आहे. शशांकने काही दिवसांपूर्वीच हा फोटो ट्विटवर शेअर केला होता. शशांकचे प्राण्यांवर असलेले प्रेम या फोटोतही दिसून येत आहे.