गांधीजींना अखरे ‘महात्मा’ पदवी कोणी दिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:03 IST2016-02-16T11:03:50+5:302016-02-16T04:03:50+5:30

एका  पत्रकाराने सर्वप्रथम गांधीजींना ‘महात्मा संबोधले.’ 

Who gave Gandhiji the title of 'Mahatma'? | गांधीजींना अखरे ‘महात्मा’ पदवी कोणी दिली?

गांधीजींना अखरे ‘महात्मा’ पदवी कोणी दिली?

ong>आपल्या सर्वांना शाळेत शिकवण्यात आले की गांधीजींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी दिली होती. परंतु यासंदर्भात एक नवीन खुलासा समोर आला आहे.

गुजरातमधील राजकोट जिल्हा पंचायत शिक्षण समितीच्या मते, नोबेल पारितोषिक विजेत टागोरांनी नाही तर सौराष्ट्रातील जेतपूर गावातील एका  पत्रकाराने सर्वप्रथम गांधीजींना ‘महात्मा संबोधले.’ 

राजकोट आणि इतर सहा जिल्ह्यांमध्ये तलाठी पदाची परीक्षा आयोजित करण्याºया राजकोट जिल्हा पंचायत शिक्षण समितीने प्रसिद्ध गांधी अभ्यासक नारायन देसाई यांच्या लेखनाचा दाखला देत कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, गांधीजी दक्षिण अफ्रिकेत असताना जेतपूरमधील एका निनावी पत्रकाराने पत्रामध्ये त्यांना महात्मा असे संबोधले होते.



समितीतर्फे घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत गांधीजींना ‘महात्मा’ पदवी कोणी दिली? या प्रश्नाचे उत्तर निनावी पत्रकार असे देण्यात आले. याविरोधात संध्या मारू या परीक्षार्थीने गुजरात उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर उत्तर म्हणून समितीने वरील प्रतिज्ञापत्र सादर केले. झालेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत न्यायधिशांनी समितीच्या कारभारावर ताशेरे ओढले.

Web Title: Who gave Gandhiji the title of 'Mahatma'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.