लग्न केंव्हा करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 02:48 IST2016-03-03T09:48:09+5:302016-03-03T02:48:09+5:30
अभिनेत्री केट विंसलेटचे म्हणणे आहे की, टायटॅनिकमधील तिचा सह-कलाकार आणि आॅस्कर विजेता लियोनाडरे डिकॅप्रियो याने आता लग्न करायला हवे.

लग्न केंव्हा करणार?
अ िनेत्री केट विंसलेटचे म्हणणे आहे की, टायटॅनिकमधील तिचा सह-कलाकार आणि आॅस्कर विजेता लियोनाडरे डिकॅप्रियो याने आता लग्न करायला हवे. डिकॅप्रियोने आॅस्कर जिंकल्यामुळे विंसलेटला खुप आनंद झाला असून, तिने यावर पहिलीच प्रतिक्रिया देताना त्याने आता संसार थाटायला हवे असे सांगितले. तसेच डिकॅप्रियो हा आदर्श पिता बनू शकतो. तो खुप शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. त्याने कधीही कोणाला दुखविले नाही. शिवाय त्याच्यातील सहकार्याची वृत्ती इतरांना खुपच भावते. तो चांगला पती व पिता बनू शकतो. त्यामुळे त्याने आता लग्न करायला हवे.
![केट विंसलेट]()