मिका सिंग चढणार पुढच्या वर्षी बोहल्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 17:25 IST2016-05-26T11:55:15+5:302016-05-26T17:25:33+5:30
पुढील वर्षी आपण बोहल्यावर चढणार असल्याची आनंदाची बातमी बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने खुद्द आपल्या चाहत्यांना दिली आहे. ‘
.jpg)
मिका सिंग चढणार पुढच्या वर्षी बोहल्यावर
या शोमध्ये तो परीक्षकाची भूमिका बजावत आहे. हे खरे असल्याचे कबूल करत, सर्व परीक्षकांनी आपापले वैवाहिक जीवनातील अनुभव कथन केले, यातून प्रेरणा मिळाल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे तो म्हणाला. कोणासोबत तरी आयुष्याचे क्षण व्यतित करण्याची वेळ आली असल्याचे आपल्याला वाटत असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
पुढील वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता जास्त वाट पाहावी लागणार नसल्याचेदेखील तो म्हणाला. आपल्या भावी जीवनसाथीविषयी अधिक काही न बोलणाऱ्या मिकाचे नाव बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले आहे. राखी सावंतसोबतदेखील त्याचे नाव जोडले गेले होते. असे असले तरी, आपल्याला एक चांगली जीवनसाथी मिळावी अशी त्याची इच्छा आहे.
गेल्या एक दशकापासून बॉलिवूडच्या संगीताचा भाग असलेल्या मिकाने ‘मौजा ही मौजा’, ‘सुबह होने न दे’ आणि ‘सावन में लग गई आग’सारखी अनेक धमाकेदार गाणी गायली आहेत. झी टीव्हीवरील ‘सा रे गा मा पा’ मध्ये मिका व्यतिरिक्त साजिद अली, वाजिद अली, प्रीतम चक्रवर्ती परीक्षकाच्या भूमिकेत आहेत.