​जेव्हा हिंदूजा होतात धार्मिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 16:58 IST2016-05-24T11:21:16+5:302016-05-24T16:58:05+5:30

गोपिचंद हिंदूजानी आपला वाढदिवस धार्मिक स्थळी साजरा करण्याचा निर्णय घेतला.

When Hindus become religious | ​जेव्हा हिंदूजा होतात धार्मिक

​जेव्हा हिंदूजा होतात धार्मिक

ंदूजा घराणे जगातील सर्वात श्रीमंत घराण्यांपैकी एक आहे. आलिशान पार्ट्यांसाठी ते ओळखले जातात. त्यामुळे गोपिचंद हिंदूजा यांच्या 75 व्या वाढदिवसाची पार्टी अशीच भव्यदिव्य स्वरुपाची असणार यात काही शंका नव्हती.

मात्र गोपिचंद यांच्या मनात दुसरेच विचार घोळत होते. त्यांनी आपला वाढदिवस विदेशातील कोणत्या रिसोर्टमध्ये नाही तर एखाद्या धार्मिक स्थळी साजरा करण्याचा निर्णय घेतला.

याबाबत त्यांनी ‘ब्लेसिंग्स’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये सांगतात की, असेच एका सकाळी माझ्या मनात विचार आला की सर्व कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक स्थळी वेळ घालावावा. सर्वांशी बोलल्यावर सर्वांनाचा ही कल्पना आवडली. त्यानुसार मग आम्ही ऋषीकेश येथील परमार्थ आश्रम आणि हरिद्वार येथील ‘हर-की-पौरी’ येथे तीन दिवस राहिलो. 

पूजा, आरती, कर्मकांडाबरोबरच सर्वांनी मिळून धर्म, कर्म आणि भाग्य आदी विषयांवर सखोल चर्चा केली. या पुस्तकात स्वामी चिदानंद सरस्वती यांचे संदेश , नवग्रह मंत्राची माहिती आणि हिंदूजा कुटुंबियांचे फोटो आहेत. सर्व मित्रपरिवारांना या पुस्तकाचे वाटप करण्यात आले आहे.

हिंदूजा गु्रपची संपत्ती 13 बिलियन डॉलर्स एवढी असून इंग्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाचे ते श्रीमंत व्यक्ती आहेत. गोपिचंद व श्रीचंद हिंदूजा लंडनमध्ये, प्रकाश स्विट्झरलँड तर अशोक भारतामध्ये स्थायिक आहेत.

hinduja

Web Title: When Hindus become religious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.