विजय मल्ल्यासाठी वेगळे निकष का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 07:38 IST
मल्ल्या 9000 कोटी बुडवून देशाबाहेर कसा काय गेला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
विजय मल्ल्यासाठी वेगळे निकष का?
‘किंग आॅफ गुड टाईम्स’ ही उपाधी मिळविलेले उद्योगपती विजय मल्ल्या सध्या अडचणीत सापडले आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपए थकवून विजय मल्ल्या परदेशात निघून गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मल्ल्या 9000 कोटी बुडवून देशाबाहेर कसा काय गेला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मल्ल्या यशस्वीपणे देशाबाहेर जाण्यासाठी सरकारच जबाबदार असून हाती न सापडायला विजय मल्ल्या म्हणजे सुई नव्हे, असा खोचक टोलाही विरोधी पक्ष सरकारला लगावत आहेत. सरकारने त्यांना वेळीच अटक का केली नाही, त्यांचा पासपोर्ट जप्त का केला नाही, बँकांनी त्यांना इतके कर्ज डोळे बंद करून कसे दिले, हे पैसे बँक कसे वसूल करणार आहे, हा खरा प्रश्न आहे.केवळ 10 हजारांच्या नोकरीसाठी दारोदार फिरणारी तरुणाई देशाचे कोटयवधी रुपए बुडवून मद्यसम्राटाचे हे पलायन उघडया डोळयांनी बघत आहे. याच विषयावर सीएनएक्सने तरुणाईचा कौल घेतला. तेव्हा त्यांनी अत्यंत कठोर प्रतिक्रिया दिल्या. विजय मल्ल्याकडून संपूर्ण रक्क्म वसूल करावी. बँकाचे उद्योजकासाठी वेगळे निकष का? असा सवालही या युवकांनी केला. विशेष म्हणजे, प्रर्वतन संचलनालयाने सीबीआयने तयार केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. देशातील प्रमुख बॅँकांनी त्यांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव करावा अशी विनंती सरकारक डे केली आहे.मात्र ही विनंती करण्यापूर्वी विजय मल्ल्या देशाबाहेर पडले होते. आता या विषयावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत रणकंदन होत आहे. दुसरीकडे मल्ल्यांनी मी देश सोडून गेलो नाही. मी आंतराष्ट्रीय उद्योगपती असून राज्यसभेचा सदस्य आहे. परदेशात कामानिमित्त आलो असल्याचे सांगून आपला बचाव केला आहे.