चंद्राच्या टॅटूचे रहस्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:25 IST2016-04-30T18:55:11+5:302016-05-01T00:25:11+5:30
चंद्रावर असणारे चुंबकीय क्षेत्रातून जेव्हा सौरवारे वाहतात तेव्हा अतिशक्तीशाली विद्युत क्षेत्र निर्माण होते.

चंद्राच्या टॅटूचे रहस्य काय?
म नवाला चंद्राचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. 1969 साली पाहिले पाऊल टाकूनही चंद्राबाबतची उत्सुकता कमी झालेली नाही.
पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र पूर्ण आकारात एखाद्या राजबिंड्या सारखा तेजोमान असतो तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी काळे डागे तर काही ठिकाणी घेरावदार प्रकाशमान वेष्टण दिसते.
या प्रकाशमान वेष्टणाचे रहस्य काय असेल याचा शोध ‘नासा’ची एक टीम घेत आहे. लुनार रेकॉनेसेन्स आॅरबिटर (एलआरओ) या मेहिमे अंतर्गत चंद्राचे निरीक्षण करण्यात आले.
गोदार्द स्पेस फ्लाईट सेंटरचे जॉन केलर यांनी माहिती दिली की, या प्रकाशमान वेष्टणांना ‘लुनार स्वर्ल्स’ म्हणतात. चंद्रावर असणारे चुंबकीय क्षेत्रातून जेव्हा सौरवारे वाहतात तेव्हा अतिशक्तीशाली विद्युत क्षेत्र निर्माण होते.
विद्युत क्षेत्रात असणाºया विद्युत कणांमुळे सौरवाऱ्यातील पार्टिकल्स विचलित किंवा त्यांचा वेग मंद होतो. सौरवाऱ्यापासून चंद्राच्या पृष्ठभागाची झिज यामुळे कमी होते. त्यामुळे असे पृष्ठभाग अधिक प्रकाशमान दिसतात आणि ज्या पृष्ठभागावर सौरवाऱ्यामुळे झिज झाली आहे तिथे काळे डाग दिसतात.