​काय सांगता! गणिताच्या भीतीने विमान 2 तास ‘लेट’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 16:20 IST2016-05-08T10:50:14+5:302016-05-08T16:20:14+5:30

गणिताची एवढी भीती वाटावी की एक प्रवासी विमानाला उड्डाण करण्यास दोन तास उशिर व्हावा?

What to say! Due to mathematics, the plane is 2 hours 'late'? | ​काय सांगता! गणिताच्या भीतीने विमान 2 तास ‘लेट’?

​काय सांगता! गणिताच्या भीतीने विमान 2 तास ‘लेट’?

ळेत सर्वात भीतीदायक विषय कोणता तर तो गणित, असे एका सुरात उत्तर मिळेल. पण या गणिताची एवढी भीती वाटावी की एक प्रवासी विमानाला उड्डाण करण्यास दोन तास उशिर व्हावा?

ऐकावे ते नवलच या प्रकारातील ही गोष्ट आहे.

ग्विडो मेन्झिओ पेन्सिल्वेनिया विद्यापीठात अर्थतज्ज्ञ आहेत. आँन्टेरिओ येथे लेक्चर देण्यासाठी ते विमानात बसले होते. उड्डाण होण्यास वेळ असल्याने ते कागदावर काही तरी आकडेमोड करत होते.

हे पाहिले त्यांच्या बाजूला बसलेल्या एका महिलेने. तिच्या मनात काय विचार आला नि तिने विमानाच्या कर्मचाºयांना सुचना दिली की, मेन्झिओ काही तरी विचित्र आकृत्या व आकडेमोड करत आहे. 

त्यानंतर कॅबिन क्रने मग मेन्झिओ यांना विमानाबाहेर नेले आणि कसून चौकशी केली. चौकशीअंती विमान कर्मचाºयांन हसावे की रडावे असे झाले. कारण मेन्झिओ कागदावर ‘डिफरेंशिअल इक्वेशन’ सोडवत होते. त्या महिला प्रवाशाला ते काही तरी अचाट करत असल्याची शंका आली.

यामुळे विमान दोन तास उशिरा निघाले. सविस्तर तपास केला असता असे आढळले की, सुरूवातील त्या महिलेने तब्येत बिघडल्याचे कारण दिले आणि मग मेन्झिओ काही तरी संशयास्पद नोंदी लिहित असल्याची माहिती कर्मचाºयांना दिली. कदाचित त्या महिलेने शाळ-कॉलेजात गणिताची जरा जास्तच धास्ती घेतली असावी!

Web Title: What to say! Due to mathematics, the plane is 2 hours 'late'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.