​मानवाला हनवटी का असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 10:39 IST2016-02-23T17:39:57+5:302016-02-23T10:39:57+5:30

मानवाला मात्र अद्यापही स्वत:च्याच शरीराचे अनेक रहस्य उकलता आलेले नाही. त्यांपैकीच एक आहे हनवटी. 

What is human beings? | ​मानवाला हनवटी का असते?

​मानवाला हनवटी का असते?

ज्ञानाने एवढी मोठी प्रगती केली आहे की, अनेक अगम्य, गूढ प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली आहेत. दूरवर आकाशगंगांचे रहस्य उकलणाऱ्या मानवाला मात्र अद्यापही स्वत:च्याच शरीराचे अनेक रहस्य उकलता आलेले नाही. त्यांपैकीच एक आहे हनवटी.

आपल्याला हनवटी का असते? तिचा आपल्याला कसा उपयोग होतो? विकासाच्या कोणत्या टप्प्यात आपल्या चेहºयावर हनवटीचा उगम झाला, यासारखी अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरित आहेत. आपले पूर्वज ‘निअँडरथल्स’ सुमारे एक लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावरून लूप्त झाले. पूर्वीच्या अंदाजापेक्षा चाळीस हजार वर्षांपूर्वीच त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले होते.

विशेष म्हणजे, निअँडरथल मानवाला हनवटी नव्हती. मग त्यांच्यापासून विक सित झालेल्या मानवाला कशामुळे हनवटी असेल या प्रश्नाचे उत्त्तर शोधण्याच्या प्रयत्नात संशोधक आहेत.

chin

वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे की, आपल्या जबड्याला आधारासाठी अतिरिक्त हाड म्हणून हनवटीचा उगम झाला ही थेअरी चुकीची आहे. कारण हनवटी बाहेरून कोणत्याच प्रकारे जबड्याला आधार देत नाही. तसेच बोलण्यासही तिचा काही उपयोग नाही, कारण त्याची स्वरयंत्रावर स्वतंत्र जबाबदारी आहे.

बहुतेक संशोधक आता हनवटीला लैंगिक निवडीचा एक भाग म्हणून अभ्यासू लागले आहेत. लैंगिक आकर्षणाचा एक भाग म्हणून हनवटीचा विचार आता रुढ होतोय. अशा या सर्व कारणांमुळे हनवटी विज्ञान संशोधनात कळीच मुद्दा बनली आहे.

Web Title: What is human beings?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.