​ब्रेकअप झाला तर काय झाले, त्याचेदेखील आहेत फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 13:25 IST2017-04-20T07:53:23+5:302017-04-20T13:25:19+5:30

ब्रेकअप आपल्याजवळ आपल्या आयुष्याचे ध्येय गाठण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, याशिवाय अन्य फायदे जाणून घेण्यासाठी वाचा हि बातमी...

What happened if the breakup happened, the advantages are also! | ​ब्रेकअप झाला तर काय झाले, त्याचेदेखील आहेत फायदे !

​ब्रेकअप झाला तर काय झाले, त्याचेदेखील आहेत फायदे !

ong>-Ravindra More
प्रेमात आकांत बुडालेल्या व्यक्तीला विचारा की ब्रेकअपचे दु:ख काय असते ते. रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अचानक नात्यात दुरावा निर्माण होणे आणि सर्वकाही एका क्षणात नष्ट होणे, खरच दु:खाचा डोंगर कोसळल्यासारखं वाटत. काहीजण तर एवढे हताश होतात की, त्यांना त्यांचे जीवन निरस वाटू लागते. त्यांना असे वाटते की आयुष्यातील सर्वकाही नष्टच झाले. मात्र खरे हे आहे की, ब्रेकअप होण्याचेही कित्येक फायदे आहेत. यामुळे मनुष्य पहिल्यापेक्षा अधिक चांगला व्यक्ती बनतो. जाणून घेऊया कसा बनतो ते. 

* एक नाते आपणास खूप काही आठवणी, अनुभवदेखील देते. हे अनुभव आपणास पहिल्यापेक्षा जास्त जबाबदार बनवितात. कमीतकमी यानंतर तुम्ही एखाद्याशी नाते बनविताना अगोदर त्या सर्व गोष्टींकडे लक्ष द्याल, ज्याकारणाने आपले पहिले नाते तुटले होते. 

* ब्रेकअपनंतर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतो. अगोदर आपणास रडण्यासाठी आपल्या पार्टनरच्या खांद्याची गरज भासायची, आता मात्र आपणास या गोष्टीची जाणिव होते की, कोणीच कोणाचं नसतं यासाठी विनाकारण कुणावरही जास्त प्रेम करण्याची गरज नाही. 

* ब्रेकअपनंतर मनुष्याला मोठ्या सत्याची जाणिव होते की, या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते. भावना बदलत असतात आणि लोकंदेखील. नात्याची सुरुवात जर चांगली असेल तर गरज नाही की, त्यांचा शेवटही चांगलाच असायला हवा. 

* प्रेम आयुष्यात फक्त एकदाच होत असते...असा विचार करुन हताश होण्याची गरज नाही कारण एकदा नात्यातून बाहेर पडल्यानंतर आपले नवीन आयुष्य सुरु होते. आपल्या पुन्हा प्रेम होऊ शकते आणि जीवनात पुन्हा नवचैतन्य येऊ शकते. 

* पार्टनरसोबत राहिल्याने आपण त्यांना संपूर्ण विश्व मानतात, आणि जवळच्या मित्रांपासून अलिप्त राहतात. मात्र जेव्हा आपला पार्टनर आपल्यापासून दूर जातो तेव्हा आपल्याजवळ मित्रदेखील राहत नाही, आणि आपणास मोठे दु:ख होते. मात्र ब्रेकअपनंतर आपणास बरेच मित्र बनविण्याची संधी मिळते आणि आपण मनमोकळेपणाने आयुष्य जगू शकतात.  

* ब्रेकअप आपल्याजवळ आपल्या आयुष्याचे ध्येय गाठण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

Web Title: What happened if the breakup happened, the advantages are also!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.