​संसार वाचविण्यासाठी जोडीदार काय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 14:28 IST2016-06-09T08:58:19+5:302016-06-09T14:28:19+5:30

संसाराला धोका निर्माण करण्याची शक्यता असलेल्या आकर्षक व्यक्तींना आपल्या नजरेत कमी लेखण्याचे जोडीदार तंत्र वापरतात.

What does the couple do to save the world? | ​संसार वाचविण्यासाठी जोडीदार काय करतात?

​संसार वाचविण्यासाठी जोडीदार काय करतात?

णूस म्हटल्यावर मोह होणारच! आपल्या जोडीदाराशिवाय इतर व्यक्तीकडे आकार्षित होणे म्हणूनच स्वाभाविक आहे. परंतु, सुखी संसार करायचा म्हटल्यावर अशा आकर्षणाला बळी पडू न देण्याची काळजी घेणे गरजेचे असते.

म्हणून तर कमिटेड रिलेशनशिपमध्ये असणारे जोडीदार संसाराला धोका निर्माण करण्याची शक्यता असलेल्या आकर्षक व्यक्तींना आपल्या नजरेत कमी लेखण्याचे तंत्र वापरतात.

याबाबतीत झालेल्या संशोधनात असे दिसून आले की, ज्यांना आपले वैवाहिक जीवन टिकवायचे असते ते लोक बाह्य आकर्षण कमी करण्याकडे लक्ष देतात. अशा वृत्तीला ‘टर्न-आॅफ’ मेकॅनिझ्म म्हणतात.

आपल्या जोडीदाराच्या आकंठ प्रेमात बुडालेले लोकांमध्ये असे करण्याची वृत्ती अधिक असते.

रुटगर्स विद्यापीठातील सहायक प्राध्यापिका आणि या अध्ययनाच्या प्रमुख शाना कोल यांनी माहिती दिली की, संसारात सुखी असलेले जोडीदार नात्याला धोका ठरू शकणाऱ्या आकर्षक व्यक्तींजास्त महत्त्व न देण्याचा प्रयत्न करतात. जेणेक रून त्यांच्या प्रती आकर्षण वाढणार नाही.

संसार आणि नाते टिकवून ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरूष दोघेही ‘परपेच्युअल डाउनग्रेडिंग’चे तंत्र अवलंबवतात. दुसऱ्या व्यक्तीकडे स्वत:ला आकर्षित होण्यापासून रोखण्यासाठी त्यांना महत्त्व न देणे, त्यांना कमी लेखणे किंवा इतर मार्गाने आकर्षण कमी करणे अशा गोष्टी केल्या जातात.

cnxoldfiles/न कळत केले जाते तर कधी जाणूनबुजून. ‘पर्सनालिटी अँड सोशल सायकोलॉजी बुलेटिन’ या जर्नलमध्ये अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे.

Web Title: What does the couple do to save the world?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.