​अंजलीला भेटण्यासाठी काय काय करायचा सचिन..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 21:53 IST2016-04-28T16:23:12+5:302016-04-28T21:53:12+5:30

किक्रेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली याची प्रेमकथा सर्वांनाच ठाऊक आहे. पण अंजलीला भेटण्यासाठी सचिनलाही बरेच पापड लाटावे लागलेत. स्मार्ट फोन नव्हता, त्या काळात सचिन अंजलीला भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा. 

What did Sachin do to meet Anjali? | ​अंजलीला भेटण्यासाठी काय काय करायचा सचिन..

​अंजलीला भेटण्यासाठी काय काय करायचा सचिन..


/>किक्रेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली याची प्रेमकथा सर्वांनाच ठाऊक आहे. पण अंजलीला भेटण्यासाठी सचिनलाही बरेच पापड लाटावे लागलेत. स्मार्ट फोन नव्हता, त्या काळात सचिन अंजलीला भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा. एका कार्यक्रमात सचिनने त्या दिवसाच्या  रोमॅन्टिक आठवणींना उजाळा दिला. माझ्या व अंजलीच्या रिलेशनशिपबाबत आमच्या कुटुंबाव्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नव्हते. अंजली जेजे रूग्णालयात शिकत होती आणि तिथेच राहायची. मी तिला भेटायला तिथे जायचो. भेट ठरवायला मी तिला बांद्रयावरून फोन करायचो. अडीच तास प्रवास करूनएका लँडलाईनवर पोहोचून मी पाऊण तासात पोहोचतो,असे अंजलीला सांगायचो. इतके करून मी कसा बसा रूग्णालयात पोहोचल्यावर कळायचे की, अंजली कुठल्याशा इमर्जेंसीमध्ये व्यस्त आहे. मग काय, मी पुन्हा बांद्रयाला जायचो आणि पुन्हा तिथून फोन करून मी पुन्हा ४० मिनिटात पोहोचतो, असे अंजलीला सांगायचो. नशीब आता स्मार्टफोनचा जमाना आहे. आता एका कॉलसाठी दोन तास प्रवास करायची गरज नाही....असे सचिनने यावेळी सांगितले.

Web Title: What did Sachin do to meet Anjali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.