फेसबुक तुने ये क्या किया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:19 IST2016-02-04T05:16:08+5:302016-02-04T11:19:23+5:30

भांडखोर नवरा-बायको फेसबुकवर नवीन प्रेम शोधत शोधत एकमेकांनाचा भेटले. याला दुर्दैव म्हणावे की आणखी काही.

What did Facebook do? | फेसबुक तुने ये क्या किया...

फेसबुक तुने ये क्या किया...

ल्या प्रत्येकाचा जोडीदार स्वर्गातच निवडलेला असतो. ‘रब ने बना दि जोडी’च म्हणा ना. मग आता वरूनच जर सगळे फिक्स होऊन आले असेल तर तुम्ही काही करा तुम्ही ते बदलू शकत नाही. आता या जोडप्याचीच गोष्ट बघा ना. बरेली शहरातील हे जोडपे सतत भांडायचे, एकमेकांवर रागराग करायचे. दोन शब्द प्रेमाचे बोलायला त्यांना जड जायचे. रोज-रोजच्या कटकटीला कंटाळून मग दोघेही नाव बदलून फेसबुकवर ‘दुसरा कोणी’ शोधू लागले.

काही महिन्यांच्या शोधानंतर त्यांना आपापला ‘इंटरेस्टिंग’ जोडीदार सापडला. तीन महिने चॅटिंग करून एकमेकांना भेटण्याचे ठरवले. मग दिलेल्या वेळेवर ठरलेल्या जागी पोहचल्यानंतर दोघांनाही काय करू नि काय नाही असे झाले. ज्याच्यापासून दूर जायचे म्हणून फेसबुकवर जोडीदार शोधू लागलो आणि इतके करूनही सातशे कोटी लोकांमधून  कोण मिळावा, तर आपलाच नवरा! आणि त्याला आपलीच ‘बायको’.

दोघांमध्ये मग तेथेच कडाक्याचे भांडण पेटले. इतके की ते सोडविण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नवराबायकोतील भांडण म्हणून दोघांवर न नोंदविता त्यांना कौंटुबिक समुपदेशन कार्यशाळेत भरती करण्यात आले. अशा प्रकारचा योगायोग जुळून येण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. पण आता अशा नशिबाला दुर्दैव म्हणायचे की आणखी काही हेच कळत नाही.
 

Web Title: What did Facebook do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.