काय ऐकतात बिल गेट्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:37 IST2016-02-06T04:07:49+5:302016-02-06T09:37:49+5:30

आता एवढी संपत्ती असलेला माणूस कसा असणार?

What Bill Bill Gates? | काय ऐकतात बिल गेट्स?

काय ऐकतात बिल गेट्स?

न दशकांपासून जगातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान बिल गेट्स यांना आहे. आता एवढी संपत्ती असलेला माणूस कसा असणार? त्याचे रोजचे आयुष्य कसे असते? तो काय खातो, त्याला काय आवडते? अशा अनेक गोष्टींबद्दल सामान्य लोकांना उत्सुकता असते. पण तुम्हाला जर वाटते असेल की मायक्रोसॉफ्टचा निर्माता बिल गेट्सला कोणती गाणी आवडत असतील तर हे जाणून घ्या, त्यांच्याकडूनच...

१. अंडर प्रेशर - डेव्हिड बोवी आणि क्वीन
मी जेव्हा विशीत होते तेव्हा कामाच्या गराड्याते खूप व्यस्त राहायचो. मात्र शुक्रवार-शनिवारी मित्रांसोबत डिस्कोमध्ये जायचो. नुकतेच वारलेला डेव्डिड बोवीचे ‘अंडर प्रेशर’ हे गाणे मला त्या डिस्को काळाची आठवण करून देते.

२. ब्लू स्काय - विली नेल्सन
मेलिंडा आणि माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री मी तिला एक सरप्राईज दिले होते. विली नेल्सनचा एका स्पेशल परफॉर्मन्स हवाई बीचवर आयोजित केला होता. त्याचे ‘ब्लु स्काय’ गाणे आम्हा दोघांना खूप आवडते.

३. आर यू एक्सपेरियन्स्ड? - जीमी हेन्ड्रीक्स
‘मायक्रोसॉफ्ट’चा सहसंस्थापक पॉल अ‍ॅल माझ्यापेक्षा मोठा होता. मी या क्षेत्रात नवखा असल्यामुळे तो मला जीमी हेन्ड्रीक्सचे ‘आय यू एक्सपेरियन्स्ड’ गाणे गाऊन सतत टोमणे मारायचा.

४. वन - यू२
आम्ही जेव्हा ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ची सुरुवात केली तेव्हा ‘यू२’च्या बोनोशी माझी ओळख झाली. संगीतकार असूनही जागतिक आरोग्याबद्दल त्याला असणाºया काळजीपोटी आमचा एकत्र प्रवास सुरु झाला.

५. टू आॅफ अस - द बिटल्स
स्टीव्ह जॉब्स आणि माझ्या मैत्रीचे किस्से तर खूप प्रसिद्ध आहेत. दोघांनी प्रथमच एकत्र मुलाखत दिली तेव्हा दोघांच्या प्रवासाचे वर्णन करताना स्टीव्हने हे गाणे गायिले होते.

६. हाऊ कॅन लव्ह सर्वाईव्ह - रॉजर्स आणि हॅमरस्टेन
‘द साऊंड आॅफ म्युजिक’च्या ब्रॉडवेमधील हे गाणे माझे आणि मेलिंडाचे सर्वात आवडीचे आहे. वॅरेन बुफेट आणि त्यांची पहिली पत्नी सुझैनने आम्हा दोघांसाठी हे गाणे गाऊन दाखविले होते.

७. माय शॉट - लिन मॅन्युएल मिरांडा, अँथनी रेमॉस
‘हॅमिल्टन’ या संगीत नाटकातील ‘माय शॉट’ हे गाणे मला नेहमीच प्रेरणा देते. एक तरुण जोखीम घेण्यास तयार आहे, तो काही तरी वेगळे करू पाहतोय अशा आशयाचे ते गाणे आहे.
--------------

Web Title: What Bill Bill Gates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.