हे काय?? या आनंदाच्या क्षणी हजर नसेल भज्जी??
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 22:07 IST2016-05-31T16:37:05+5:302016-05-31T22:07:05+5:30
क्रिकेटपटू हरभजन सिंह याची पत्नी गीता बसरा लवकरच आई होणार आहे. आम्ही ही गुड न्यूज तुम्हाला आधीच दिली आहे. मात्र येत्या ४ जूनला गीताचे डोहाळं जेवण होणार आहे. होय, बेबी शॉवर..या आनंदाच्या क्षणी भज्जीने हजर राहायला हवे होते. पण हे काय?? भज्जी या सोहळ्याला मुकणार..आता का??

हे काय?? या आनंदाच्या क्षणी हजर नसेल भज्जी??
क रिकेटपटू हरभजन सिंह याची पत्नी गीता बसरा लवकरच आई होणार आहे. आम्ही ही गुड न्यूज तुम्हाला आधीच दिली आहे. मात्र येत्या ४ जूनला गीताचे डोहाळं जेवण होणार आहे. होय, बेबी शॉवर..या आनंदाच्या क्षणी भज्जीने हजर राहायला हवे होते. पण हे काय?? भज्जी या सोहळ्याला मुकणार..आता का?? तर बेबी शॉवरच्या या सोहळ्यात केवळ महिलाच सामील होऊ शकतात. पुरूषांचे यावेळी कुठलेही काम नसते. याचमुळे भज्जी गीताच्या बेबी शॉवरवेळी हजर नसणार. गीता सध्या लंडनमध्ये कुुटुंबीयांसोबत आहे. तिचे कुटुंबीय गीताचा बेबी शॉवर अगदी धूमधडाक्यात साजरा करणार आहेत. जुलैमध्ये लंडनमध्ये गीता बाळाला जन्म देणार आहे. यानंतर आक्टोबरमध्ये गीता बाळासह भारतात परतणार आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये गीता व हरभजन यांचा पंजाबी पद्धतीने विवाह पार पडला होता.