​शिल्पा-राज ब्रेकअपच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 16:23 IST2016-06-02T10:37:45+5:302016-06-02T16:23:50+5:30

बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटांचा सिलसिला सुरु आहे. फरहान अख्तर-अधुरा भबानी आणि अरबाज-मलायका यांच्या घटस्फोटांच्या जोरदार चर्चा बीटाऊनमध्ये रंगतायत.

On the way to Shilpa-Raj Breakup | ​शिल्पा-राज ब्रेकअपच्या मार्गावर

​शिल्पा-राज ब्रेकअपच्या मार्गावर

लीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटांचा सिलसिला सुरु आहे. फरहान अख्तर-अधुरा भबानी आणि अरबाज-मलायका यांच्या घटस्फोटांच्या जोरदार चर्चा बीटाऊनमध्ये रंगतायत. या यादीत आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे नावही जोडले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते शिल्पा आणि राज यांच्या सध्या काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.


स्पॉटबॉय डॉट कॉमच्या बातमीनुसार, राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून आॅफिसमध्येच राहत आहे. गेल्या १५ दिवसांपासून ते घरी गेलेले नाहीत. त्यांचं आॅफिस मुंबईत असूनही ते घरी गेलेले नाहीत. 

राज कुंद्रा यांचे आॅफिस वांद्रे येथे आहे तर घर जुहू परिसरात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ते गेल्या १५ दिवसांपासून आॅफिसमध्ये राहत आहेत. गेल्या १५ दिवसांत ते एकदाच घरी गेले तेही कपडे घेण्यासाठी. या व्यक्तिरिक्त ते घराकडे फिरकलेलेही नाहीत. 

राज यांच्या या वागणुकीवरुन शिल्पा आणि राज यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरु आहे. २००९मध्ये शिल्पा आणि राज विवाहबंधनात अडकले होते.

Web Title: On the way to Shilpa-Raj Breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.