धोनीच्या मुलीसोबत विराटचा सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 15:09 IST2016-03-30T22:08:40+5:302016-03-30T15:09:32+5:30
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचविणारा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्यासोबत एक सेल्फी काढता यावी, यासाठी त्याचे चाहते धडपडत असताना त्याला मात्र एका चिमुकलीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

धोनीच्या मुलीसोबत विराटचा सेल्फी
ट -२० वर्ल्डकपमध्ये भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचविणारा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्यासोबत एक सेल्फी काढता यावी, यासाठी त्याचे चाहते धडपडत असताना त्याला मात्र एका चिमुकलीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. विराट कोहलीने एका क्युट मुलीसोबत सेल्फी काढला आहे आणि ही मुलगी आहे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याची मुलगी झिवा. विराट कोहलीने झिवासोबत सेल्फी काढल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटवर टाकला आहे.
या फोटोमध्ये झिवा मोबाईल कानाला लावून बसलेली दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना विराटने लिहिले आहे की, झिवाने माझा फोन घेतला आहे आणि तो कसा हॅण्डल करायचा हे ती शिकत आहे.
या फोटोमध्ये झिवा मोबाईल कानाला लावून बसलेली दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना विराटने लिहिले आहे की, झिवाने माझा फोन घेतला आहे आणि तो कसा हॅण्डल करायचा हे ती शिकत आहे.