विराट म्हणतो, जो वादा किया वो निभाना पडेगा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 09:34 IST2016-02-29T16:34:26+5:302016-02-29T09:34:26+5:30
अनुष्का व विराट दोघेही ब्रेकअपवर बोलायला तयार नाहीत. पण विराट अनुष्काला अद्यापही विसरू शकलेला नाही, असे दिसतेय.
.jpg)
विराट म्हणतो, जो वादा किया वो निभाना पडेगा...
क रिकेटपटू विराट कोहली व अनुष्काच्या लव्हस्टोरीच्या बातम्या जितक्या रंगल्या, तितक्याच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही रंगत आहे. अनुष्का व विराट दोघेही ब्रेकअपवर बोलायला तयार नाहीत. पण विराट अनुष्काला अद्यापही विसरू शकलेला नाही, असे मात्र दिसतेय. काल रविवारी भारतीय उच्च आयुक्तालयाने टी-२० सामन्यात पाकिस्तानला धूळ चारणाºया भारतीय क्रिकेट टीमसाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विराटचे हे दु:ख अप्रत्यक्षपणे समोर आले. या कार्यक्रमात विराटने स्वत:हून माईकचा ताबा घेतला आणि ‘ताजमहाल’ चित्रपटातील ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ हे गाणे गाण्यास सुरूवात केली. विराट मंचावर गात असतानाचा व्हिडिओ युवराज सिंगने शूट केला आणि काही वेळात तो व्हायरल झाला. आता हे गाणे अनुष्कासाठी होते की काय, हे विराट सांगो.