विक्रम चटवालचे आयुष्य पूर्वपदावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:53 IST2016-01-16T01:05:56+5:302016-02-05T12:53:23+5:30
अमेरिकेतील हॉटेल व्यवसायिक विक्रम चटवाल आता पूर्ववत आयुष्य जगाय...

विक्रम चटवालचे आयुष्य पूर्वपदावर
अ ेरिकेतील हॉटेल व्यवसायिक विक्रम चटवाल आता पूर्ववत आयुष्य जगायला लागले आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांनी मित्रांसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. आपल्या नवीन प्रकल्पांची माहिती त्यांना द्यावी हा त्यामागील उद्देश होता. मागील काही दिवसांमध्ये विक्रम यांची मन:स्थिती ठीक नव्हती. प्रिया सचदेव हिच्याशी त्याचे वैैवाहिक संबंध टिकू शकले नाहीत. त्यानंतर ते मादक पदार्थांच्या आहारी गेले होते, असे त्यांचे वडील संतसिंग चटवाल यांनी सांगितले. ते मागील काही दिवसांआधी ते दिल्लीमध्ये होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली. ते म्हणाले, माणसाच्या आयुष्यात सर्वच दिवस सारखे नसतात. चढ उतार येत असतात. पण विक्रम आता सामान्य आयुष्य जगत आहे. तो आनंदात आहे.
डिसेंबर 2014 मध्ये संतसिंग चटवाल हे अमेरिकेत प्रचारादरम्यान राजकीय पक्षांना अवैध देणगी दिल्याबद्दल दोषी आढळले होते. यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. सध्या केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने या पक्षासोबत त्यांचे काय संबंध आहेत, या प्रश्नावर त्यांनी फार काही बोलण्यास नकार दिला. 2010 मध्ये चटवाल यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता हे विशेष. ते म्हणाले, माझा कोणा एका पक्षाशी संबंध नाही, मी भारतासोबत काम करतो.कोणता पक्ष सत्तेवर आहे, याच्याशी मला काही देणे घेणे नाही. माझे नाते भारताशी आहे, याचा मला आनंद आहे.