ट्विटरने वाढविली व्हिडीओची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 20:18 IST2016-06-24T14:48:03+5:302016-06-24T20:18:03+5:30
ट्विटरने ही खास नवीन भेट यूजर्संना उपलब्ध करुन दिली आहे.

ट्विटरने वाढविली व्हिडीओची वेळ
युजर्संना ट्विटरवर पूर्वीपेक्षा आता जास्त वेळ व्हिडीओ अपलोड करता येणार आहे. ट्विटरने ही खास नवीन भेट यूजर्संना उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे १४० सेकंदापर्यंतचा व्हिडीओ शेअर करता येणार आहे. याअगोदर ३० सेकंदाचा व्हिडीओ अपलोड करता येत होता. युजर्संना आकर्षीत करण्यासाठी ही वेळ वाढविण्यात आली आहे.
फेसबुक व्हिडीओसोबत स्पर्धा करण्यासाठी ट्विटरने हा बदल केला आहे. शेअरिंगचे प्रमाण हे वाढत आहे. यूजर्स हा व्हिडीओ वाइन अॅपवरही पाहू शकतात.