अलिकडे एक फार चांगला आणि कौतुकास्पद विचार ठामपणे समोर येताना दिसतोय. तो म्हणजे आपलं सत्य, आपला रंग-रूप, आपला आकार जसा आहे तसा स्वीकार करणं. कुणासारखं होण्याऐवजी आपण स्वत:च एक उदाहरण बनायचं. यात प्लस साइज मॉडेलही येतात. विक्टोरिया सीक्रेट जगातला पहिल्या क्रमांकाचा लॉन्जरी आणि मेकअप ब्रॅन्ड आहे. यात पहिल्यांदाच एक प्लस साइज मॉडेल मॉडेलिंग करताना दिसणार आहे.

विक्टोरिया सीक्रेटन एक यूकेतील लॉन्जरी कंपनी ब्लूबेलासोबत टायअप केलं आहे. मॉडल अली टेट कटलर ब्लबेलासाठी मॉडलिंग करते. आता ती विक्टोरिया सीक्रेटसाठी मॉडेलिंग करणार आहे.

अली टेट कटलरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. 'मला असं वाटतं की, मी विक्टोरिया सीक्रेटची पहिली प्लस साइज मॉडल आहे. मला एका ब्रॅंन्डसोबत काम करण्याचा फार अनुभव नाही. पण हा योग्य दिशेने उचलण्यात आलेलं योग्य पाऊल आहे'.

अली अमेरिकेत राहते. अमेरिकेत प्लस साइज मॉडलिंगचा ट्रेन्ड सुरू झालाय. असात अलीचं विक्टोरिया सीक्रेटसोबत काम करणं मोठी बाब समजली जात आहे.

फॅशनच्या विश्वात प्लस साइजला यूएस साइज १४ सुद्धा म्हणतात.

Web Title: Victoria secret hires first plus size model Ali Tate Cutler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.