व्हॅलेंटाईन-डेला सर्वाधिक खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 13:40 IST2016-02-10T08:10:53+5:302016-02-10T13:40:53+5:30
१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन- डे. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सध्या प्रेमीयुगुलांची जोरदार तयारी चालू आहे. अशावेळी खर्चाकडे पाहायचे नसते असे म्हटले जाते.

व्हॅलेंटाईन-डेला सर्वाधिक खर्च
१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन- डे. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सध्या प्रेमीयुगुलांची जोरदार तयारी चालू आहे. अशावेळी खर्चाकडे पाहायचे नसते असे म्हटले जाते. म्हणून तर व्हॅलेंटाईनच्या काळात मुलं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी अतिपैसा खर्च करतात असे एका सर्वेक्षणातून समोर आले.
गिफ्टइज डॉट कॉमने मेट्रो शहरातील तीन हजार लोकांचे सर्वेक्षण केले. १८ ते ४५ वयोगटातील हे सर्व लोक होती. व्हॅलेंटाईन डेच्या काळात होणारा खर्च आणि व्हॅलेंटाईनचे महत्त्व याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यातून लोकांचा या दिवसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, गिफ्ट देण्याचे पॅटर्न आणि त्यावर होणार खर्च यांविषयी रंजक माहिती हाती आली.
६८ टक्के लोकांनी सांगितले की ते व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत. त्यातील ३७ टक्के लोकांनी केवळ जोडीदारसोबत साजरा करणार असल्याचे सांगितले तर, २२ टक्के लोक मित्रांसोबत, ८ टक्के लोकांना यंदाच्या १४ फेब्रुवारीला पहिली डेट मिळण्याची अपेक्षा आहे.
व्हॅलेंटाईन डेला मुलं सरासरी ७४० रुपये गिफ्टवर खर्च करतात तर मुली ६७० रुपये खर्च करतात. ४२ टक्के मुलं फुलं किंवा चॉकलेट गिफ्ट करण्यात धन्यता मानतात तर १७ टक्के मुलं प्रेयसीला सरप्राईज देण्याचे प्लॅन करीत असतात. ३४ टक्के मुली मुलांना गॅजेट्स, परफ्युम (१९ टक्के) आणि असेसरिज (१६) असे गिफ्ट दिले जाते.