शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

VALENTINE SPECIAL : ​वयाने लहान व्यक्तीवर प्रेम करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 18:37 IST

आपणही जर आपणाहून लहान वयाच्या व्यक्तीवर प्रेम करीत असाल आणि आपणास जर हे नाते अधिक मजबूत असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.

-Ravindra Moreहे खरे आहे की प्रेमात वयाचे काही बंधन नसते. आपणास एखादा व्यक्ती आवडतो आणि त्यावर प्रेम करायला लागतो. यावेळी तो किती लहान आहे किंवा किती मोठा याचा साधा विचारही मनात येत नाही. आपणही जर आपणाहून लहान वयाच्या व्यक्तीवर प्रेम करीत असाल आणि आपणास जर हे नाते अधिक मजबूत असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. * कमी वयाचे व्यक्ती नात्यात कमिटमेंट करण्यासाठी घाबरतात. कारण ते कमी वयात जबाबदारी नाही पेलू शकत असे त्यांना वाटते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर दबाव टाकण्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने व्यवहार करा. नात्यात पूर्णत: गुंतल्याने आपले स्वातंत्र्य नष्ट होईल असे त्यांना वाटते. * कमी वयाच्या व्यक्तींना लूक, देखावा जास्त महत्त्वाचा असतो, मग तो स्वत:चा असो की पार्टनरचा. अशावेळी अगोदर स्वत:ला आरशासमोर ठेवा, आपण कसे दिसतो ते पाहा आणि मग भेटायला जा. * कमी वयाची व्यक्ती भविष्याची जास्त चिंता करीत नाही. फक्त ते वर्तमानकाळात जगतात म्हणून जास्त खर्चही करतात. अशावेळी आपण आपल्या पाकिटाचाही विचार करावा. सोबतच त्यांना समजावा की नाहक केलेला खर्च फायदेशीर नसतो. * कमी वयाची व्यक्ती आपल्या पार्टनरमध्ये आपले पालक शोधत असतो. जर आपण एखाद्या कमी वयाच्या व्यक्तीसोबत डेटिंगसाठी जात असाल त्याचे लहान मुलासारखे वागणे सहन करण्यासाठी तयार राहावे. आपला अनुभव आणि वय दोन्हीही जास्त असल्याने ती व्यक्ती आपला आदरही करते. त्यामुळे त्यांची काळजी घ्या.Also Read : ​​PROPOSE DAY SPECIAL : मुलीला प्रपोज करायचंय? वापरा या १० क्रिएटिव्ह टिप्स !                   ​PROPOSE DAY SPECIAL : गर्लफ्रेंडला ‘प्रपोज’ करताना !